Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»अचानक आलेल्या चक्रीवादळाने होत्याचे नव्हते!
    अपघात

    अचानक आलेल्या चक्रीवादळाने होत्याचे नव्हते!

    शेड कोसळून एकाचा मृत्यू : झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 6, 2026No Comments319 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    मूल तालुक्यात मंगळवारी दुपारी आलेल्या अचानक तुफान चक्रीवादळाने मोठा कहर केला. राजोली येथील रहिवासी प्रशांत डोनुजी शेणमारे (वय ४५) यांचा शेड कोसळून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राजोली गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. ०५ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजताच्या सुमारास तीव्र उकाड्यानंतर अचानक जोरदार तुफान चक्रीवादळासह गारपीट व मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

    तसेच राजोली रेल्वे स्टेशनजवळील आपल्या शेतात प्रशांत शेणमारे यांनी नुकताच सिमेंट विटा निर्मितीचा व्यवसाय सुरू केला होता. त्यासाठी त्यांनी सिमेंट विटांचे शेड उभारले होते. वादळ सुरू होताच प्रशांत यांनी शेडखाली आश्रय घेतला. मात्र काही क्षणातच जोरदार वाऱ्यामुळे संपूर्ण शेड कोसळले आणि ते ढिगाऱ्याखाली दबले गेले. या भीषण दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    याशिवाय घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे पाठविला. मृत प्रशांत शेणमारे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

    दरम्यान, तुफान वादळामुळे राजोली मूल मार्गावर अनेक ठिकाणी मोठी झाडे कोसळली. एका ठिकाणी झाडाखाली चारचाकी वाहन दबले असून वाहनाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. दुपारी साडेतीन वाजल्यापासून राजोली–मूल मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!

    September 16, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif