Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»राज्यात लवकरच ‘धर्मांतरबंदी कायदा’ येणार
    महाराष्ट्र

    राज्यात लवकरच ‘धर्मांतरबंदी कायदा’ येणार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 27, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    प्रलोभने दाखवून किंवा बळजबरीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. राज्यात लवकरच ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करण्याचे संकेत गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी गुरुवारी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना दिले.

    धर्मांतराच्या तक्रारींची दखल घेत सरकार यासंदर्भातील कायद्याचा मसुदा आणि अंमलबजावणीबाबत गांभीर्याने विचार करत आहे. कोणाचेही नुकसान करण्याचा आमचा हेतू नाही, मात्र कायद्याचा धाक असणे आवश्यक आहे, असे भोयर म्हणाले. राज्यातील मदरशांमध्ये चालणाऱ्या उपक्रमांबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. मदरशांमधील कामाची आणि तिथे घडणाऱ्या प्रकारांची सखोल पडताळणी केली जाईल. त्यानंतर पुढील योग्य तो कायदेशीर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

    विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका मदरशात दोन लहान मुलांना अमानुष मारहाण होत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे. या प्रकरणाची सत्यता पडताळण्याचे आदेश सिंधुदुर्ग पोलिसांना देण्यात आले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. राज्यात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालणाऱ्या अवैध धंद्यांवर सरकारने चाप बसवण्याचे ठरवले आहे.

    नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बारचा परवाना पहिल्यांदा काही दिवसांसाठी निलंबित केला जाईल. मात्र, वारंवार नियमांची पायमल्ली होत असल्याचे आढळल्यास, संबंधित बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा भोयर यांनी दिला. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्रालयाबाबत केलेल्या विधानांचाही पंकज भोयर यांनी समाचार घेतला.

    “मंत्रालय हे कोणाच्या विरोधात कट रचण्याचे ठिकाण नसून सर्वसामान्यांना न्याय देणारे केंद्र आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी मंत्रालयाविषयी चुकीची विधाने करणे टाळावे,” असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

    #maharashtra Law Minister of State for Home Affairs Pankaj Bhoyar Prohibition of Religious Conversion Act Religious conversion vidhan bhavan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

    March 10, 2026

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.