Sunday, November 27, 2022

शिंदे सरकार गेली १५ दिवस जेवणावळीतच व्यस्त – एकनाथ खडसे

- Advertisement -

 

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

- Advertisement -

- Advertisement -

राज्यात पावसामे थैमान घातले असून लोकांना चांगलाच त्याचा फटका बसल्याचे दृश्य समोर आहे. आणि एकीकडे सत्तानाट्य व सत्तान्तार्ण होऊन १५ चे वर दिवस लोटले आहेत. पण अद्याप राज्याला स्वतंत्र कार्यभार असणारा कोणताच मंत्री लाभला नसल्याने. एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटले कि, पुरामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक जनावरे, शेती पुरामुळे वाहून गेली आहे मात्र, असंवेदनशील शिंदे सरकार गेली १५ दिवस जेवणावळीतच व्यस्त असल्याचा आरोप खडसे यांनी केला. नामांतराच्या मुद्य्यावरून त्यांनी शिंदे सरकार हे क्रेडीट घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले. ते म्हणाले कि नामांतराचा निर्णय हा उद्धव ठाकरे यांनी करून त्यावर शिक्कामोर्तबही झाले आहे. १५ दिवस झाले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या दोघांच्या भरवश्यावरच राज्य सुरु आहे आणि जनता वाऱ्यावर असल्याची टीका खडसेंनी केली.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना ग्रामीण भागातील जनतेशी काही नसल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे जनतेला दिलासा कोण देणार? असा प्रश्नही एकनाथ खडसेंनी राज्य सरकारला विचारला आहे.

विरोधी पक्षनेतेपदावर ते काय म्हणाले

अद्याप वरिष्ठांशी चर्चा झाली नसून ज्या पक्षाचे आमदार जास्त असतील त्यांचाचा विधानपरिषद विरोधी पक्ष नेता असेल, असं एकनाथ खडसे म्हणाले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या