संतांनी वारकरी संप्रदायाला नवी दिशा दिली : ना. गिरीष महाजन

मंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून ४००० वारकरी पंढरपुरी रवाना

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

जामनेर : महाराष्ट्र ही संतांची भुमी असुन आपल्या पवित्र अशा महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव एकनाथ, संत मुक्ताबाई, संत निवयांच्या सह अनेक संत महात्मे होऊन गेले या संतानी नेहमीच किर्तन अभंग व भजनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाला नवी दिशा व भक्तीचा मार्ग दाखविला. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा भक्तीमार्ग आहे. पंढरपूरची वारी दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी हे पंढरीच्या विठोबाच्या दर्शनासाठी जात असतात पंढरपूर ही वारकरी संप्रदायाची ओळख आहे.

वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनावर मोठा प्रभाव टाकुन या संप्रदायाने लोकांना भक्ती, समता, आणी न्यायाचा संदेश दिला. आषाढी एकादशीला पंढरपुरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणे हेच प्रत्येक वारकर्‍यांचे स्वप्न असते. परंतु ज्या वेळी विठु माऊली दर्शनासाठी बोलविते व वारकर्‍यांना साक्षात दैवी रुपात येऊन विठ्ठलाचे दर्शन घडविले जाते या पेक्षा जीवनात काही मोठे नाही. राज्याचे पर्यटन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून जामनेर मतदार संघातील सुमारे ४००० हजार वारकर्‍यांना पंढरपुरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी रवाना झाले त्यावेळी ते बोलत होते.

तालुक्यातील तसेच शहरातील वारकरी मोठ्या उत्साहात जामनेर येथुन वाहनाने भुसावळ येथुन आरक्षित मोफत “विशेष रेल्वे” गाडीने पंढरपुरला रवाना झाले. ना. गिरीष महाजन व जामनेर नगरीच्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते गाडीस हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आल्या त्याप्रसंगी तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष महेंद बाविस्कर, नगरसेविका संध्या पाटील, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, आतिश झाल्टे, बाबुराव अण्णा हिवराळे, श्रीराम महाजन, सुहास पाटील, उल्हास पाटील, स्वीय सहाय्यक दिपक तायडे, शहराध्यक्ष रविंद्र झाल्टे, सुभाष पवार, कैलास पालवे, विजय शिरसाठ, यांच्या सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.