तीन बंडखोर उमेदवारांचे बॅनर फाडले

कठोर कारवाईची मागणी करत पोलिसात तक्रार

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

अकोल्यात भाजप आणि ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवारांचे प्रचाराचे बॅनर अज्ञातांनी फाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या तीनही बंडखोर उमेदवारांच्या प्रचाराचे बॅनर अज्ञात लोकांनी फाडले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

भाजपने तिकीट नाकारल्यामुळे अशोक ओळंबे आणि अलीमचंदनी नाराज होते. त्यामुळे ओळंबेंनी प्रहार पक्षावर उमेदवारी घेतली. तर अलीमचंदानी अपक्ष उमेदवार आहे. नुकताच त्यांना वंचितने पाठिंबा जाहीर दिला आहे. भाजपचे बंडखोर तथा परिवर्तन महाशक्ती तिसऱ्या आघाडीचे उमेदवार अशोक ओळंबे यांच्यासह भाजपचे दुसरे बंडखोर अपक्ष उमेदवार हरीश अलीमचंदानी यांचे प्रचाराचे फलक फाडले आहे. तसेच ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांचेही लावण्यात आलेले प्रचार फलक फाडण्यात आले आहे. अकोला शहरातल्या शिवाजी पार्क परिसरातील हा प्रकार आहे.

दरम्यान, अकोला पश्चिम मतदारसंघात योगी आदित्यनाथ आणि बच्चू कडू यांची प्रचार सभा पार पडली होती. ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक रहोंगे तो सेफ रहोंगे’ असा नारा योगी यांनी दिला होता. तर हिंदू आणि मराठी मतांमध्ये आता विभाजन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा बच्चू कडूंनी थेट आरोप केला होता. त्यानंतर आज सकाळच्या सुमारास तिन्ही बंडखोर उमेदवारांचे प्रचार फलक फाडण्यात आले. उमेदवारांनी समर्थ रामदास पेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. बॅनर फाडणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आता प्रचार बॅनर फाडण्याचा हा वाद कुठल्या विकोपाला घेऊन जातो? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.