Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलणाचा गोरखधंदा
    गुन्हे वार्ता

    जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलणाचा गोरखधंदा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 20, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    बांगलादेशी महिलांना पुण्यात आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या “बाबू भैया” वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बुधवार पेठेत झालेल्या कारवाईनंतर हा बाबू भैया उर्फ पापा शेख याचे नाव समोर आले आहे. बांगलादेशच्या सीमेवर बोगस आधार कार्ड तयार करून देणाऱ्या दलालांच्या संपर्कात हा बाबू होता. काही दिवसांपूर्वी पुण्यातील बुधवार पेठेत ११ बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. फरासखाना पोलिस ठाण्यात या बाबू भैया उर्फ पापा शेख याच्या विरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    याप्रकरणी पापा शेख यासह सुमित्रा कांबळे, राजेश कलीमनी, रणजीत पात्रा, रूपा शेख यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सगळी टोळी हे रॅकेट चालवत होती असे तपासातून निष्पन्न झालं आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील बुधवार पेठेत पुणे पोलिसांनी कारवाई केली. यावेळी २२ महिलांना ताब्यात घेतले असता त्यातील ११ जणी या बांगलादेशी असल्याचं तपासातून समोर आलं. या ११ महिला बोगस आधार कार्ड आणि इतर कागदपत्र बाळगत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात राहून वेश्याव्यवसाय करत होत्या.

    खोटे आश्वासन देऊन वेश्या व्यवसायात

    या आरोपींनी या महिलांना ब्युटी पार्लर तसेच शिलाईकाम मिळवुन देतो, असे खोटे आश्वासन देत, त्यांच्याकडू जबरदस्तीने तसेच पैशाचे आमिष दाखवून, वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत होता. त्यांना कुंटनखान्यात ठेऊन, त्यांच्या वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतील रक्कम स्वतःकडे ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पोलिसांकडून या महिलांना आता बांगलादेशला पाठवलं जाणार असून या सगळ्या दलालांची कसून चौकशी सुरू आहे.

    बाबू भैया २० वर्षापासून पुण्यात

    बाबू भैया उर्फ पापा शेख हा गेल्या २० वर्षांपूर्वी पुण्यातील बुधवार पेठ या ठिकाणी असणाऱ्या एका हॉटेलमध्ये छोट मोठं काम करत होता. हळूहळू त्याने तिथे असलेला वेश्य व्यवसाय कसा चालतो हे माहिती करून घेतलं आणि त्यातले अनेक बारकावे सुद्धा समजून घेतले. कालांतराने त्याने बांगलादेश मधून येणाऱ्या अल्पवयीन तरुणींना कोलकत्ता मार्गे पुण्यात आणायला सुरुवात केली आणि त्यातून त्याने पैसा कमवायला सुरुवात केली. बाबू भैयाचं शिक्षण फक्त पाचवीपर्यंत झाले आहे.

    तिन्ही बायकांचे बुधवार पेठेत वर्चस्व

    बाबू भैयाचे तीन विवाह झाली आहेत आणि त्याची एक पत्नी बांगलादेशी आहे. त्याच्या तिन्ही पत्नी सध्या बुधवार पेठेत मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतात. बाबू भैयाच्या तिन्ही पत्नी यांचं बुधवार पेठेतील एका भागात वर्चस्व असल्यामुळे त्यांच्या इथून सुटका करून बाहेर पडणे हे अनेक महिलांना जमत नाही. एखाद्या महिलेने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर तिला या बाबूच्या पत्नीकडून मारहाण होत असे. अशाच एका गुन्ह्यात बाबूवर पोलिसात गुन्हा दाखल असून तो फरार आहे.

    गेल्या अनेक वर्षांपासून बुधवार पेठेत वास्तव असलेल्या बाबू भैयाचे पोलिसांसोबत चांगलं सूत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचे याच भागात दोन छोटे हॉटेल, ३ बिल्डिंग असून त्यातील एक अनधिकृत आहे.

    Aadhar Card Babu Bhaiya alias Papa Sheikh Bangladesh Bangladeshi women Budhwar Peth prostitution pune
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

    March 10, 2026

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.