हफ्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार
डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचा घोळ संपला : फडणवीस म्हणाले...
लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यातील हफ्ता कधी मिळणार? असा सवाल विरोधकांकडून सरकारला केला जात होता. अशातच लाभार्थी महिला देखील डिसेंबरमध्ये मिळणाऱ्या हफ्त्याची वाट पाहत होत्या.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन संपताच लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार असल्याचे स्पष्ट सांगितले होते. अशातच लाडकी बहीण योजनेसंदर्भातील मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता याच आठवड्यात मिळणार आहे. तर पहिल्या टप्प्यात ३५ लाख महिलांना या योजनेचे पैसे मिळणार आहे. तर उर्वरित महिलांना दुसऱ्या टप्प्यात या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
हफ्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना या महिन्याचा हफ्ता त्यांच्या खात्यात जमा झालेला दिसणार आहे.