लग्नसराईत सोन्याचे भाव भिडले गगनाला!

ग्राहकांच्या खिशाला कात्री : उतरती कळा थांबली

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क 

सोन्याच्या दरात मागील दिवसांपासून भाव वाढलेले चित्र पाहायला मिळते. अर्थसंकल्पामुळे सोन्या आणि चांदीच्या भावाने जवळपास निच्चांक गाठलेलाही दिसला. मात्र आता हा आठवड्या संपत आला असून सोने आणि चांदीच्या वायदा किंमत अजूनही वाढलेली पाहायला मिळाली. सोन्याचे फ्युचर्सचे भाव सुमारे 75, 249 रुपये तर, चांदीच्या वायद्याची किंमत आज वाढलेली दिसत आहे.

या आठवड्यात सोन्याची उतरती कळा आता पूर्णपणे थांबलेली दिसत आहे. मागील किती दिवसांपासून साने वाढताना दिसत आहे. सोन्याच्या फ्युचर्सच्या किंमतीत वाढीसह सुरुवात झाली असून मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा बेंचमार्क डिसेंबर वायदा 525 रुपयांनी वाढून 76, 334 रुपयांवर उघडला तर मागील बंद हा 75, 724 सोन्याच्या फ्युचर्स किंमतीने या वर्षी 79, 775 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती.

 

सराफा बाजारातील किंमत

दुसरीकडे, चांदीच्या वायदा किंमतीत मंदीनंतर आता वाढ पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचा डिसेंबर वायदा 200 रुपयांनी वाढला असून 91, 500 रुपयांवर उघडला तर सोन्याच्या किंमतीसह यावर्षी चांदीच्या दारांनीही विक्रमी पातळी गाठली आणि प्रति किलो एक लाख पार मुसंडी मारली. 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 71, 600 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 78, 110 आहे.

 

22 कॅरेट सोन्याचा आजचा दर (प्रति 10 ग्रॅम)

जळगाव : 71, 600 रुपये

मुंबई :  71, 600 रुपये

पुणे :  71, 600 रुपये

नागपूर : 71, 600 रुपये

कोल्हापूर : 71, 600 रुपये

 

24 कॅरेट सोन्याचा आजचा दर (प्रति 10 ग्रॅम)

जळगाव : 78, 110 रुपये

मुंबई : 78, 110 रुपये

पुणे : 78, 110 रुपये

नागपूर : 78, 110 रुपये

कोल्हापूर : 78, 110 रुपये

Leave A Reply

Your email address will not be published.