जिद्दीच्या जोरावर धानोऱ्याचा तरुण झाला पोलीस!

0

धानोरा, ता. चोपडा

जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम या त्रिसुत्रीला अनुसरुन प्रयत्नांना मेहनतीची जोड देत गरीबीवर मात करीत पोलीस होण्याचे स्वप्न येथील दीपक कोळी या तरुणाने पूर्ण केले आहे. सुरुवातीपासून यशाला गवसनी घालणे आणि कठोर परिश्रम घेणे असा चंग दीपकने मनी बाळगला होता. या मेहनतीच्या झाडाला यशाचे फळ लागले असून दीपक महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाला आहे.

येथील रहिवासी राजेंद्र दिपा कोळी यांचा मुलगा दीपक राजेंद्र कोळी याने सन 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरतीत कठोर परिश्रम व योग्य नियोजन करून ग्राऊंडमध्ये 41 गुण व लेखीमध्ये 97 गुण मिळवून एकंदरीत 138 गुण घेऊन जनरल संवर्गात जळगाव पोलिस पदी निवड झाली आहे. भरतीची तयारी करत असतांना अनेक अडचणी निर्माण झाल्या तरी त्याने संघर्ष व सातत्य ठेऊन यश मिळवले आहे.

धानोरा येथील ग्राउंडवर कोणत्याही प्रकारची सोई सुविधा उपलब्ध नसतांना कोणत्याही प्रकारचे क्लास किंवा ॲकॅडमी न लावता स्वत: घरच्या घरी अभ्यास करुन यश मिळविले. वडीलांना शेती कामात देखील मदत करण्यात दीपक सातत्याने कार्यरत असे. त्याच्या या यशाबद्दल गावातून मित्र परिवाराने त्याची मिरवणूक देखील काढली. सामाजिक कार्यकर्ते सचिन साळुंखे, अर्जुन साळुंखे, गोपाळ साळुंखे, मुकेश साळुंखे, दीपक साळुंखे, दीपक मधुकर साळुंखे यांच्यासह मान्यवरांनी त्याचे कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.