नेपाळमध्ये बसला जलसमाधी : जळगावच्या प्रवाश्यांचा समावेश

अनेक प्रवासी ठार : मायातांची संख्या वाढण्याची शक्यता : बसमध्ये होते ४० प्रवासी

0

 

नवी दिल्ली

मध्य नेपाळमध्ये आज शुक्रवारी ४० भारतीय प्रवाशांची बस नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून ही प्रवाशांची बस मर्सियांगडी नदीत कोसळली आहे. तनहुन जिल्ह्यातील आयना डोंगराजवळ ही घटना घडली आहे. ४० प्रवाशांची बस कोसळल्यानंतर सशस्त्र पोलीस दलाने मदत कार्य सुरु केलं आहे.

 

घटनास्थळी ४५ जणांचं पथक मदतीसाठी पोहोचलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, घटनास्थळावरून १० ते ११ मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे. गोरखपूरचे प्रवासी नेपाळच्या दिशेने निघाले होते. ही बस पोखरातून काठमांडूला निघाली होती. ही उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी अबू खैरेनी घटनास्थळी पोहोचले आहेत.

 

बसमधील भाविक जळगाव जिल्ह्यातील

अपघातग्रस्त बसमधील काही भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. यूपी आणि नेपाळ प्रशासनाशी संपर्क साधला असून १३ प्रवाशांना वाचविण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. अद्याप पूर्ण माहिती प्राप्त झाली नसून काही वेळात संपूर्ण माहिती येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशचे प्रशासकीय अधिकारी नेपाळच्या अधिकारी नेपाळच्या संपर्कात आहे. गोरखपूरच्या बसचा नेपाळमध्ये अपघात झाला आहे. या बसमध्ये उत्तर प्रदेशातील किती लोक होते, याचा शोध सुरु आहे. बस चालवणारा चालक हा गोरखपूरचा रहिवासी होता. या अपघातातून १६ प्रवाशांचा जीव वाचवण्यात आला आहे.

 

नेपाळच्या स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. अपघातस्थळी बचाव पथकाचं मदतकार्य सुरु आहे. एसएसपी माधव पौडेल यांच्या नेतृत्वात नेपाळचं सैन्य दल, सशस्त्र पोलीस दलाचे जवान घटनास्थळी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.