Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    • गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच पक्षाचे अस्तित्व!
    राजकारण

    कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच पक्षाचे अस्तित्व!

    नेत्यांच्या कोलांटउड्या स्वहिताच्या : ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 17, 2026No Comments207 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच कुठल्याही पक्षाचे अस्तित्व टिकून राहते, नेते या पक्षातून त्या पक्षात गेले म्हणजे पक्ष, मतदार, कार्यकर्ते गेले असे होत नाही. सध्या नेत्यांच्या कोलांटउड्या स्वहिताच्या असून काही पदरात पाडून घेण्यासाठी शिंदेसेना आणि भाजपाला अच्छे दिन आले असल्याचे मत ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी लोकशाहीच्या विशेष लोकसंवादात व्यक्त केले.

    गेल्या चाळीस वर्षांपासून मी राजकारणात सक्रिय असून पक्ष उभारण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे मला माहित आहे, आजच्या राजकारणात राम राहिलेला नाही. सर्वत्र भयाचे वातावरण तयार झाले आहे. एखादा आमदार, खासदार या पक्षातून त्या पक्षात गेला म्हणजे त्याच्या पाठीमागे कार्यकर्ते, मतदार जातात असे होत नाही. कोणताही पक्ष हा मोठ्या नेत्यांच्या जोरावर नव्हे, तर तळागाळातील कार्यकर्त्यांच्या निष्ठा, श्रम आणि जनाधारावर उभा असतो. एखादा नेता पक्ष बदलतो म्हणून त्याच्यासोबत संपूर्ण मतदारसंघ, कार्यकर्ते किंवा विचारधारा स्थलांतरित होत नाही, अशा स्पष्ट शब्दांत ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. लोकशाहीच्या लोकसंवादात त्यांनी बदलत्या राजकारणातील मूल्यांची घसरण, पक्षांतराचे वाढते प्रमाण आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर मत व्यक्त केले.

    राज्यात गेल्या काही वर्षांत झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथींचा संदर्भ देताना श्री. खडसे म्हणाले की, आज अनेक नेते वैचारिक भूमिकेपेक्षा वैयक्तिक स्वार्थ, सत्ता आणि पदासाठी पक्ष बदलताना दिसत आहेत. अशा प्रकारच्या पक्षांतरामुळे पक्षाचे मूळ अस्तित्व किंवा जनाधार संपुष्टात येत नाही. उलट, एखाद्या पक्षाची खरी ताकद ही त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि सामान्य मतदारांमध्ये असते. राजकीय पक्ष उभारण्यासाठी अनेक दशकांची मेहनत घ्यावी लागते. गावागावांत जाऊन लोकांशी संवाद साधावा लागतो, संघर्ष करावा लागतो आणि कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करावा लागतो. एका दिवसात किंवा एका नेत्याच्या निर्णयामुळे पक्ष तयार होत नाही आणि संपतही नाही, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.

    गेल्या चार दशकांहून अधिक काळाच्या राजकीय अनुभवाचा उल्लेख करताना श्री. खडसे म्हणाले की, त्यांनी पक्ष संघटन उभारण्यासाठी तळागाळात काम केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या कष्टाची आणि त्यागाची किंमत चांगलीच माहीत आहे. आज अनेकांना तयार पक्ष, तयार व्यासपीठ आणि सत्तेची संधी सहज मिळते. मात्र, पक्ष उभा करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो, हे त्या प्रक्रियेतून गेलेल्या व्यक्तीलाच समजू शकते, असे ते म्हणाले.

    राजकीय पक्षांतरावर भाष्य करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गट आणि भाजपकडे गेलेल्या नेत्यांवर टीका केली. आज अनेक जण काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडे जात आहेत. वैचारिक भूमिका किंवा जनतेचे प्रश्न यापेक्षा वैयक्तिक लाभाला अधिक महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे राजकारणाचा चेहराच बदलत चालला आहे. श्री. खडसे यांनी सध्याच्या राजकीय वातावरणावरही चिंता व्यक्त केली. राजकारणात मूल्याधिष्ठित नेतृत्वाची गरजही श्री. खडसे यांनी अधोरेखित केली. पक्षांतर हा लोकशाहीतील वैधानिक अधिकार असला, तरी तो जनतेच्या विश्वासाचा आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर ठेवून व्हायला हवा, अन्यथा सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि राजकीय व्यवस्थेवरील विश्वास कमी होण्याचा धोका निर्माण होतो, असेही त्यांनी सांगितले.

    राजकारणात ‌‘राम‌’ नाही!

    आजच्या राजकारणात पूर्वीचा ‌‘राम‌’ राहिलेला नाही. विचार, तत्त्व आणि मूल्यांवर आधारित राजकारण कमी होत चालले आहे. त्याऐवजी सत्तेभोवती फिरणारे राजकारण वाढले असून समाजातही भयाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे ते म्हणाले. लोकशाहीमध्ये मतभिन्नतेला स्थान असले पाहिजे, मात्र सध्या अनेक निर्णय दबावाखाली घेतले जात असल्याचे चित्र दिसत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

    जिल्ह्यात अवैध धंद्यांचे जाळे!

    जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांचे जाळे विणले जात असतांनाही लोकप्रतिनिधींचा धाक प्रशासनावर राहिलेला नाही हे सिद्ध होत आहे. दारु, खून, दरोडे, अवैध वाळू वाहतूक या सारख्या अप्रिय घटना मोठ्या प्रमाणावर घडत असतांनाही एकही मंत्री आवाज उठवत नसेल तर हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे. सत्तेतील पदाधिकारी या अवैध धंद्यांमध्ये हात पिवळे करुन घेत असल्याचा आरोप श्री. खडसे यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif