Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»संपादकीय»नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    संपादकीय

    नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 17, 2026No Comments186 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    ३ मेला नीट परीक्षा होणार होती. त्याआधीच नीटचे पेपर लीक झाल्याची बातमी कळली. त्यामुळे नीट परीक्षा रद्द करण्यात आली. 73 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी नीटच्या पेपर फुटी मुळे खिलवाड झाला आहे. म्हणजे सर्व विद्यार्थी नीट परीक्षेची तयारी केलेली असतानाही पेपर फुटला म्हणून ही नीट परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय केंद्र शासनाचे शिक्षण विभागाने घेतला. आता ही परीक्षा 21 जूनला घेण्यात येईल, असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. 21 जूनला होणाऱ्या नीट परीक्षेसाठी कसलेही शुल्क लागणार नाही. मागे जी फी विद्यार्थ्यांनी भरली होती त्याच फी मध्ये 21 जून ची परीक्षा घेतली जाईल. नीट पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. लातूर येथील दयानंद कॉलेजचे माजी प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. पी. व्ही. कुलकर्णी हे केमिस्ट्रीचे प्राध्यापक असून त्यांना केमिस्ट्रीचे पेपर सेट केले होते. ते निवृत्त होऊन आज चार वर्षे झाली. सध्या ते पुणे येथे त्यांच्या मुलाकडे राहतात आणि प्रायव्हेट कोचिंग येथे नीटच्या विद्यार्थ्यांसाठी क्लासेस देतात. दुसऱ्या प्राध्यापक मनीषा मांढरे यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. त्या पुणे येथील मॉर्डन कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. मनीषा मांढरे या झूलॉजी व बॉटनीच्या प्राध्यापक असून त्यांनी सुद्धा पेपर सेट केले आहेत. पी. व्ही. कुलकर्णी हे सुद्धा पेपर सेटर आहेत. या दोघांच्या मधला दुवा म्हणजे पुणे येथील ब्युटी पार्लर चालविणाऱ्या मनीषा वाघमारे या होत. मनीषा वाघमारे, नाशिक येथील शिवम खैरनार आणि अहिल्यानगर येथील धनंजय लोखंडे हे तिघे पेपर फुटीतले मास्टर माईंड आहेत. या तिघांनी पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांच्याशी संपर्क साधून पेपर लीक केले आहेत. या सर्वांना पाच दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली आहे. पी. व्ही. कुलकर्णी यांनी पुण्यात जे नीटसाठी कोचिंग घेतले जात होते त्या कोचिंग मधील विद्यार्थ्यांना जे प्रश्न काढून दिले ते जसेच्या तसे केमिस्ट्रीच्या विषयातील प्रश्न आले होते. बाकी झूलॉजी आणि बॉटनीमध्ये प्राध्यापक मनीषा मांढरे यांनी जे प्रश्न काढून दिले होते. ते जसेच्या तसे आले होते. पी व्ही कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांनी काढलेले प्रश्न लीक करण्याचे काम शिवम खैरनार, धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे या तिघांनी केले. लाखो रुपये या पेपर लीक मधून कमावले आहेत. मनीषा वाघमारे या जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना गळाला लावायच्या. म्हणजे श्रीमंत बापाची पोर जमवून पेपर लीक मधून आपला उल्लू सीधा करत होत्या. आता त्यांचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.

    सीबीआयच्या वतीने लातूरमध्ये पी. व्ही. कुलकर्णीकडे धाड टाकून त्यांना पुण्यातून ताब्यात घेतले गेले तर आणखी सहा जणांची सीबीआयची टीम लातूरमध्ये ठाण मांडून आहे. तेथे त्यांनी एक प्रायव्हेट कोचिंग क्लासवर धाड टाकून तपास केला जात आहे. हे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस हे प्राध्यापक शिवाजी माटेगावकर यांचे आहेत. येथे अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, पण कसून तपास चालू आहे. खाजगी शिकवणी वर्ग एवढे जोरात कसे काय चालतात? याचा संशय सीबीआयला आल्याने ते तेथे ठाण मांडून बसले आहेत. एकंदरीत खाजगी शिकवणी वर्गाचे अलीकडे जे फॅड झाले आहे. ते विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या परीक्षेतील प्रश्न पुरविल्या जातात. त्यामुळे सध्या नियमित महाविद्यालयात जाण्यापेक्षा खाजगी शिकवणी मध्ये वर्गात विद्यार्थी गर्दी करतात. त्याचे कारण हेच आहे. परीक्षेत येणारे महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थ्यांना दिले जातात. आणि त्यापैकी काही प्रश्न जरी आले तरी विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी मदत होते. त्या पुढे अशा खाजगी शिकवणी वर्गावर बंदी घालावी अशी जी मागणी आहे, त्यातूनच पुढे आली आहे. संभाव्य प्रश्नपत्रिकांच्या नावावर त्यांनी पेपर लीक झाले झालेले प्रश्न त्यात असतात. त्यामुळे विद्यार्थी अभ्यास न करता अशा कोचिंग क्लासेसकडे जाण्याचा कल वाढतो आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे पैसा आहे, ते विद्यार्थी नियमित कॉलेज व्यतिरिक्त अशा खाजगी शिकवणी वर्गात जातात. म्हणजे नियमित कॉलेजला जायचे नाही फक्त खाजगी शिकवणी वर्ग केले म्हणजे झाले, असा त्यांचा कल असतो. कॉलेजमध्ये गेले तरी फक्त एन्जॉय करण्याकरिता जायचे. म्हणजे अभ्यास न करता परीक्षा पास व्हायचे हा त्यांचा फंडा असतो. त्यामुळे या खाजगी शिकवण्या वर्ग बंद कराव्यात अशी आमची मागणी आहे. खाजगी शिकवणी वर्ग हे पेपर फुटीचे मूळ कारण आहे, असे मत झाले आहे. काही ठिकाणी खाजगी शिकवणी वर्ग इतके चालतात की त्यांना सुद्धा वर्गाच्या तुकड्या करून कॉलेज सारखे वर्ग चालवावे लागतात. तर हे समांतर शिक्षण पद्धती बंद झाली पाहिजे तरच पेपर फुटीचे प्रकरण होणार नाही..!

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!

    June 10, 2026

    तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!

    June 9, 2026

    पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!

    June 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif