Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा एकोणिसावा दिवस
    संपादकीय

    सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा एकोणिसावा दिवस

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 16, 2026No Comments163 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख 

    कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीच्या जंतर-मंतर रोडवर गेल्या 26 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. सीईटी परीक्षेचा पेपरफुटी प्रकरणी आणि सीबीएसई परीक्षेतील घोळ प्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. दरम्यानच्या काळात शास्त्रज्ञ सोनम वांगचुक हे आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाचा आज एकोणिसावा दिवस आहे. त्यांच्यासोबत काही विद्यार्थी सुद्धा आमरण उपोषण करीत असून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. परंतु सोनम वांगचुक यांनी दवाखान्यात उपचार घेण्यास नकार दिला आहे आणि उपोषण मागे घ्यायलाही ते तयार नाहीत. त्यांची प्रकृती कमालीची ढासळली असून त्यांचे वजन नऊ किलोने कमी झाले आहे. “माझा मृत्यू झाला तरी चालेल, पण मी उपोषण मागे घेणार नाही,” अशी त्यांची भूमिका आहे.

    दरम्यान देशभरातून सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला सर्व स्तरांतून जोरदार पाठिंबा मिळत आहे. अनेक जण म्हणत आहेत की, “तुमचा जीव फार महत्त्वाचा आहे. तुम्ही उपोषण मागे घ्यावे.” असे अनेक जण म्हणत आहेत. पण सोनम वांगचुक हे असूनही तसूभरही आपल्या निर्णयात बदल करीत नाहीत. आज दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. त्याची दिल्ली हायकोर्टाने दखल घेतली असून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना पाचारण करून सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. त्यांना योग्य ती सरकारी वैद्यकीय मदत मिळत आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात तुषार मेहता यांनी सांगितले की, सोनम वांगचुक यांना सरकारी वैद्यकीय मदत मिळत आहे.

    सरकारी वैद्यकीय मदत जरी मिळत असली तरी सत्ताधारी भाजप सरकार मात्र या उपोषणाकडे पूर्णपणे पाठ फिरवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा गृहमंत्री अमित शहा यांनी चुकूनही सोनम वांगचुक यांची विचारपूस केलेली नाही. सपशेल कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केलेले दिसत आहे. काही झाले तरी कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन हाणून पाडायचे, हे भारतीय जनता पक्षाचे धोरण आहे. त्याचबरोबर काहीही झाले तरी आणि कितीही दिवस लागले तरी कॉक्रोच जनता पार्टी हे आंदोलन चालूच ठेवणार आहे.

    कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आणखी कोण मदत करत आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु त्यांना जनतेकडून पूर्णपणे मदत मिळत आहे. जेवण मिळत आहे, झोपण्यासाठी अंथरूण-पांघरूण देण्यात येत आहे, टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. काही जण अंघोळ करतात, काही करत नाहीत; असा त्यांचा दिवस जात आहे. पोलिसांचा अधूनमधून दबाव जाणवत आहे. पोलिसांची रॅपिड फोर्स आणून कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे. परंतु कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते तसूभरही मागे हटत नाहीत. ते म्हणतात, “सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना तुम्ही सोशल मीडियातून सपोर्ट करा. ज्यांना जंतर-मंतर येथे येणे शक्य आहे त्यांनी जंतर-मंतर रोडवर येऊन आंदोलनात सहभागी व्हा.”

    जसे-जसे आंदोलन वाढत चालले आहे आणि सोनम वांगचुक यांचे उपोषण वाढत चालले आहे, तसे-तसे त्या उपोषणाला आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी संघटनांच्या वतीने आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देण्यात आला असून अनेक शेतकरी जंतर-मंतर रोडवरील आंदोलनात सामील झाले आहेत. सर्व शेतकरी या कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वाटेल ती मदत करत आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनांचा फार मोठा पाठिंबा मिळत आहे. त्या व्यतिरिक्त अनेक नेते तसेच नसरुद्दीन शाह यांसारख्या व्यक्तींनीही आंदोलनात सहभागी होऊन सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आपला पाठिंबा दिला आहे.

    एकंदरीत सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आता 19वा दिवस असून ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत. येत्या 20 जुलै रोजी संसदेवर कॉक्रोच जनता पार्टीचा भव्य मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चामध्ये बहुसंख्येने तरुण सामील होऊ शकतात. फक्त पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून या मोर्चात सामील व्हा, असे कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी आवाहन केले आहे.

    महाराष्ट्रातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला व सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आपण पूर्ण पाठिंबा देत आहोत, असे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रभर या आंदोलनाला पाठिंबा म्हणून प्रतीकात्मक आंदोलने करण्याचे ठरवले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना उपोषणस्थळी पाठवून त्यांची विचारपूस करण्यास सांगितले आहे. “आपल्याला काय मदत हवी?” याचीही विचारपूस या खासदारांनी केली आहे.

    आम आदमी पक्षाच्या वतीनेदेखील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला असून ते आंदोलनात सक्रियपणे उतरले आहेत. इतर डाव्या पक्षांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेस पक्षाचाही पाठिंबा मिळावा यासाठी हालचाली सुरू आहेत. संसदेवरील मोर्चा यशस्वी झाला तर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. अशा प्रकारे सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण आता संपूर्ण भारताचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच सीईटी परीक्षा रद्द प्रकरणाशी संबंधित आत्महत्या केलेल्या 17 विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडेही या आंदोलनामुळे देशाचे लक्ष वेधले जात आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!

    September 16, 2026

    गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!

    September 15, 2026

    लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!

    September 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif