मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात महायुतीचे सरकार येईल आणि पुढचा मुख्यमंत्री भाजपाचा होईल. जेव्हा 2029 मध्ये तुम्ही मला हा प्रश्न विचाराल, तेव्हा मी सांगेन की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्यमंत्री होईल. माझी ही गोष्ट आपण लिहून ठेवा, असा अंदाज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान व्यक्त केला.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार आहे. याबरोबरच राज्यात पुढचा मुख्यमंत्री कोण होईल, याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, अशातच आता मुख्यमंत्रीपदाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कुणाची सत्ता येईल आणि कोण मुख्यमंत्री बनेल, याबाबत राज ठाकरे यांनी भाकीत वर्तवले आहे. पक्ष फोडाफोडीवर घटनेवरही राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
कोणत्याही पक्षाच्या बाबतीत अशा गोष्टी होता कामा नये, असे राज ठाकरे म्हणाले. मी शिवसेनेतून बाहेर पडलो, त्यावेळी मी पक्ष फोडला नाही. मला पक्षातून इतर नेते फोडून पक्ष निर्माण करायचा नव्हता असे राज ठाकरे म्हणाले. मला वेळ लागला तरी चालेल असे राज ठाकरे म्हणाले. पण महाराष्ट्रावर आताच्या परिस्थितीतून बाहेर येईल. महाराष्ट्रावर खोलवर संस्कार झाले आहेत. यातून महाराष्ट्र बाहेर येईल. महाराष्ट्र खूप मोठा आहे. असे राज ठाकरे म्हणाले.
आज महाराष्ट्रातील परिस्थिती खूप लाजीरवाणी झाली आहे. कोण कुठेही जात आहे. ही निवडणूक मतदारांच्या मतांच्या अपमानाचा बदला घेण्याची असल्याचे ते म्हणाले.