लोकशाही न्यूज नेटवर्क
नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आता पोलीस देखील सज्ज झाले आहेत. थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करताना महिला छेडछडीला आळा घालण्यासाठी विशेष खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे. गिरगाव चौपाटी तसंच नरीमन पॉइंट याठिकाणी मुंबई पोलिसांकडून खास तयारी करण्यात आली आहे.
यासाठी पहिल्यांदाच गिरगाव चौपाटीवर दोन वेगवेगळे भाग करण्यात आले आहेत. यात फॅमिलीसाठी वेगळा आणि तरुणाई तसंच पुरुष मंडळींना वेगळा भाग करण्यात आला आहे. महिला स्पेशल पोलीस देखील यावेळी सिव्हिल ड्रेसमध्ये गस्त घालणार आहेत. तसंच गिरगाव चौपाटीवर फटाके वाजवण्यास आणि मद्यपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. यात पहिल्यांदाच गिरगाव चौपाटीवर फॅमिली आणि तरुणाईसाठी 2 वेगवेगळे झोन करण्यात आले आहे. या सेलिब्रेशन पार्टीमध्ये महिला स्पेशल पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये गस्त घालणार आहेत. 21 सीसीटीव्हीसह ड्रोन कॅमेऱ्याने या सर्व परिसरावर नजर ठेवली जाणार आहे. नरीमन पॉइंट, गिरगाव चौपाटीवर नो पार्किंग आणि फेरीवल्यांना मनाई करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटीवर फटाके वाजवण्यास तसंच मद्यपान करण्यास मनाई असणार आहे.