Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»राज्यसभेवर जाणाऱ्यांचे नावे अखेर जाहीर
    महाराष्ट्र

    राज्यसभेवर जाणाऱ्यांचे नावे अखेर जाहीर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 4, 2026Updated:March 4, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    भारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राज्यसभेचा पत्ता कट झाल्याच्या बातम्या सुरू असतानाच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भाजपने राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने रामदास आठवले आणि विनोद तावडे यांना राज्यसभेचे उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. त्यासोबत आणखी दोन नेत्यांनाही भाजपने राज्यसभेची संधी दिली आहे. या यादीतून भाजपने सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न करतानाच मित्र पक्षांनाही संधी देण्यात आल्याचं दिसून आलं आहे.

    राज्यसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ आली असताना, भारतीय जनता पक्षाने (भाजप) महाराष्ट्रातील चार जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने विनोद तावडे, रामदास आठवले, माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांना राज्यसभेच्या उमेदवारीसाठी संधी दिली आहे. या निवडीत राजकीय अनुभव, पक्षनिष्ठा आणि प्रादेशिक संतुलन यांचा विशेष विचार केल्याचे दिसते.

    महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यापूर्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात आणि राज्यस्तरीय समित्यांमध्ये सखोल चर्चा झाली. अनेक नेत्यांच्या नावांवर विचारविनिमय झाल्यानंतर, या चार नेत्यांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब झाले. राज्यातून एकूण सात जागा रिक्त आहेत. महाराष्ट्रातील भाजपकडे विधानसभेत १३२ आमदारांचे बळ आहे, ज्यामुळे पक्षाला आरामात तीन ते चार उमेदवार निवडून आणता येऊ शकतात. पक्षाने सुरुवातीला २५ संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली होती, त्यातील या चार नावांवर सकारात्मक निर्णय झाला.

    उमेदवारांच्या नावांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या कोअर कमिटीतील प्रमुख नेत्यांच्या तीन महत्त्वाच्या बैठका झाल्या. या बैठकींमध्ये विविध नावांवर चर्चा झाली आणि नंतर ही यादी दिल्लीला पाठवण्यात आली.

    दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रासह १० राज्यांतील ३७ जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील सात जागांसाठी अधिसूचना २६ फेब्रुवारी रोजी जारी झाली. नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख ५ मार्च आहे.

    Bharatiya Janata Party Maya Chintaman Evenate Rajya Sabha Ramdas Athawale Ramrao Vadkute Republican Party Union Minister of State for Social Justice Vinod Tawde
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

    March 10, 2026

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.