दिल्ली रक्ताळली : ‘या’ कुख्यात दहशतवाद्याचे नाव चर्चेत

स्फोटात तो ठार झाला की आणखी काही? : कसून तपास सुरु

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ काल संध्याकाळी झालेल्या भीषण कार स्फोटामध्ये अनेक वाहनं जळून खाक झाली, 9 निरपराध लोकांनी जीव गमवाले, अनेकांच्या डोक्यावरचं छत्र उडालं आणि कित्येक लोकं जखमी होऊन रुग्णालयाच्या खाटेवर पडले आहेत. काहींची अद्याप मृत्यूशी झुंज सुरू आहे. याप्रकरणात कालपासून नवनवी नाहिती, काही अपडेट्स येत असून डॉ. उमर याचे नावे प्रामुख्याने समोर आले आहे. ज्या कारमध्ये स्फोट झाला, त्यामध्ये डॉ. उमर आधी दिसला होता. स्फोटात तो ठार झाला की आणखी काही झालं याचाही कसून तपास करण्यात येत आहे.

तपास यंत्रणांच्या भीतीने हा स्फोटाचा कट?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. उमर-ऊ-नबी याने तपास यंत्रणांच्या भीतीने हा स्फोटाचा कट रचला होता. अटक होण्याच्या भीतीने त्याने कारमध्ये डेटोनेटर लावून स्फोट घडवून आणल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. एक माहिती नुसार या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी उमरच्या आईला ताब्यात घेतले असून, उमरने आईला कॉल करून त्रास देऊ नकोस असे सांगितले होते. आईचा फोन आला तेव्हा उमरेने लायब्ररीत असल्याचा बहाना केला. मात्र त्याच्या डोक्यात माणसं मारण्याचा कट शिजत होता. तसेच, काही दिवस लायब्ररीत असल्याचे त्याने आईला सांगितले होते. उमरची आई आणि दिराला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त होत असून उमरची वहिनी मात्र उमर असे काही करणार नाही असा विश्वास व्यक्त करत आहे.

दरम्यान दिल्लीतील जीवघेण्या स्फोटानंतर लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चा नेता, कुख्यात दहशतवादी हाफिज सईद चर्चेत आहे. स्फोटाच्या एक दिवस आधीच, लष्कर कमांडर सैफुल्लाहचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हाफिज सईद गप्प बसणार नाही असा दावा करताना सैफुल्लाहचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र असं असलं तरी दिल्ली स्फोटासंदर्भात जो तपास करण्यात येत आहे, त्यात अद्याप तरी लष्करचा कोणताही संबंध आढळलेला नाही.

लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेची स्थापना 1987 साली पाकिस्तानमध्ये झाली. भारतात आतापर्यंत पाच मोठे दहशतवादी हल्ले केल्याचा आरोप लष्करवर आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा यातील सर्वांत जीवघेणा आणि मोठा, सर्वात महत्त्वाचा आहे. 2008 मध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी मुंबईत ठिकठिकाणी हल्ले केले. यामध्ये एकूण 166 लोकं मारले गेले, तर 300 पेक्षा जास्त लोकं जखमी झाले.

लष्करवर जैश-ए-मोहम्मद आणि रेसिडेंट फ्रंट सारख्या दहशतवादी संघटनांशी सहकार्य करून दहशतवादी हल्ले केल्याचा आरोप आहे. दक्षिण आशिया दहशतवाद पोर्टलनुसार, सध्या लष्करमध्ये अंदाजे 5हजार दहशतवादी सक्रिय आहेत. लष्करच्या सर्व दहशतवाद्यांचे ट्रेनिंग हे पाकिस्तानमध्येच होतं.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मे महिन्यात केलेल्याऑपरेशन सिंदूर या कारवाईदरम्यान भारतीय सैन्याने लष्कर-ए-तैयब्बाच्या अनेक ठिकाणांवर हल्ला केला. मुरीदके येथील लष्करचा तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. या कारवाईत जैशनंतर लष्करचे सर्वाधिक नुकसान झाले. शेकडो दहशतवादी मारले गेले.

Leave A Reply

Your email address will not be published.