गायक केकेच्या मृत्यूचं गुढ वाढलं; चेहऱ्यावर, डोक्यावर जखमेच्या खुणा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क | कोलकाता
प्रसिद्ध गायक केकेंच्या मृत्यूचं गुढ वाढलं आहे. केके यांच्या मृत्यूप्रकरणी न्यू मार्केट पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस त्यांच्या कुटुंबीयांची वाट पाहत आहेत. केके यांच्या निधनांतर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. तपास अधिकारी पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालाची वाट पाहत आहेत. पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही पाहिलं आहे. आतापर्यंत पोलीस या प्रकरणाची कार्यवाही अनैसर्गिक मृत्यू प्रकरण म्हणून करत आहेत.
केके यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरीही प्राथमिक माहितीनुसार, त्यांचा मृत्यू कार्डियक अरेस्टमुळे झाल्याचं बोललं जात आहे.
केके ज्यावेळी कोलकाता येथील एका कॉन्सर्टमध्ये लाइव्ह परफॉर्म करत असताना त्यांना स्ट्रोक आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
केके यांचा मृत्यू कसा झाला यावर डॉक्टरांनी अद्याप कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही. रिपोर्ट्सनुसार पोस्टमॉर्टमनंतर यामागचं कारण स्पष्ट होऊ शकेल.

Leave A Reply

Your email address will not be published.