संत बाळूमामा मंदिरात मुक्ताई पालखीवर उधळला भंडारा

टाळ मृदंगाच्या गजराने भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याचा प्रवास

0

 

मुक्ताईनगर | लोकशाही  न्यूज नेटवर्क 

 

श्री शेत्र मुक्ताईनगर ते श्री शेत्र पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळा हा 28 जून रोजी संत मुक्ताई जुने मंदिर कोथळी येथून हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने आदिशक्ती संत मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे निघालेली आहे. या पालखी सोहळ्यात असंख्य वारकरी व दिंडी सोहळ्यातील टाळ मृदंगाच्या गजराने भक्तिमय वातावरणात हा पालखी सोहळा प्रवास करीत आहे.

जळगाव, बुलढाणा, जालना, बीड या जिल्ह्यातून प्रवास करून आता संत मुक्ताई पालखी सोहळा धाराशिव (उस्मानाबाद)  जिल्ह्यात पोहोचला आहे. आतापर्यंत मुक्ताई पालखी सोहळ्याचा 22 ठिकाणी मुक्काम झालेला आहे. तसेच या पालखी सोहळ्याने 600 कि.मी. पैकी आतापर्यंत 450 कि.मी. अंतर पार केलेले आहे. तसेच 150 कि.मी. अंतर पालखी  सोहळ्याचे अजून बाकी आहे. पाच दिवसानंतर 14 जुलै रोजी हा पालखी सोहळा पंढरपूर येथे पोहोचणार आहे.

8 जुलै रोजी संत बाळूमामा मंदिर वकवाड येथे संत मुक्ताई पालखीवर भंडारा उधळण्यात आला यावेळी असंख्य वारकरी व भावीक मोठ्या संख्येने संत बाळूमामा मंदिर वकवाड येथे उपस्थित होते. 9 जुलै रोजी पालखी सोहळा दुपारच्या सुमारास धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील भूम येथे दुपारी थांबलेला होता. यावेळी श्री चौंडेश्वरी देवी व्यापारी मंडळ यांनी वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. तसेच रात्रीचा मुक्काम भूम येथील रवींद्र हायस्कूल येथे असून त्याच ठिकाणी भोजनाची सुद्धा व्यवस्था होती.

आज 10 जुलै रोजी पालखीचा दुपारचा थांबा आष्टा येथे असणार आहे. व भोजनाची व्यवस्था गावकरी मंडळी तर्फे केली जाणार आहे. तसेच रात्रीचा मुक्काम जवळा येथे असून तेथे सुद्धा भोजनाची व्यवस्था गावकरी मंडळी करणार आहे.  पंढरपूर येथे पोहोचल्यावर संत नामदेव महाराज आजेगुरू व संत मुक्ताबाई पालखी सोहळा भेटविसावा दुपारी 4 वाजता व श्री संत मुक्ताई पादुकांचे चंद्रभागा स्नान व पंढरपूर प्रवेश मुक्ताई मठ दत्त घाट. त्यानंतर आषाढ शु.10 दि. 16 जुलै रोजी संत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या संतांच्या पालखी सोहळा भेटी वाखरी निघणे 11 वाजता होणार आहे. त्यानंतर 21 जुलै रोजी हा पालखी सोहळा श्री क्षेत्र मुक्ताईनगर कडे परत वारी प्रस्थान करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.