‘मिसिंग’ ही भावना मानसिक पातळीवर गहिरा परिणाम करणारी!

असणं आणि नसणं यातील अंतर! : भाग चार

0

 

लोकशाही विशेष लेख

असणं आणि नसणं या लेखमालेच्या आजच्या भागात आपण मानसिक व भावनिक परिणामांचा विचार करणार आहोत. हे मानसिक व भावनिक परिणाम त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतात. तसेच हे मिसिंग करणाऱ्या व्यक्ती वा घटनेवरही अवलंबून असते.  कोणा व्यक्तीला मिस करणे यात भावना, स्मृती व त्या माणसाची असलेली ओढ यांचा अंतर्भाव असतो. यातील काही पैलूंचा आपण विचार करू…

 

भावनिक बंधन (ओढ) : माणूस वेगळ्या प्रकारची भावनिक अनुभूती घेतो. यात उदास, खिन्नता, दुःख या भावनांसोबत त्या व्यक्तीची वारंवार आठवण येते.

आठवण : त्या व्यक्तीच्या आठवणी जाग्या होणे, आपलं काही तरी हलवलंय ही भावना तीव्र होते.

भावबंध : व्यक्तीशी असलेल्या दृढ संबंधांचा हरविल्याच्या तीव्रतेवर प्रभाव पडतो. म्हणजे व्यक्ती जितकी जवळची तितकी हरविल्याची भावना अधिक.

दुःख वा शोक : मिसिंगची भावना दुःख वा शोक यांना चालना देते. यात नकार, राग, सौदेबाजी, नैराश्य आणि स्वीकृती यांचा समावेश होतो.

एकटेपणा : इतरांपासून वेगळे पडल्याची, इतरांपासून दुरावल्याची भावना निर्माण होते.

स्मरणरंजन : भूतकाळातील अनुभवांचा वारंवार आठवण करणे, त्यातील आनंदाची उजळणी करणे, वर्तमानातील आनंदाला पारखे करते आणि त्यामुळे आपले खूप मोठे नुकसान झाले आहे अशी भावना वाढीस लागते.

स्व-ओळख हरवणे : जीवनात एखादी व्यक्ती मिस केल्याच्या धयाने माणसाच्या स्व-ओळख व जीवन उद्दिष्टाच्या अनुषंगाने प्रश्न निर्माण होऊ शकतात.

विसरण्याची भीती : आठवणी किंवा व्यक्ती विसरण्याची चिंता.

भावनिक नियमन : भावनांचे व्यवस्थापन करण्यात अडचण येते. ज्यामुळे वारंवार मूड बदलणे, चिडचिड होणे, मोकळेपणाने न बोलणे, जीवन त्या नकारात्मकतेने भारावणे वा व्यापून टाकते.

स्वीकृती आणि एकत्रीकरण : अखेरीस, व्यक्ती त्या क्षणी नसल्याचे स्वीकारणे आणि पुढे जाणे.

 

एखाद्याला मिस करणे हा एक सार्वत्रिक मानवी अनुभव असू शकतो आणि या मानसिक पैलू समजून घेतल्याने त्यात समाविष्ट असलेल्या भावनांवर प्रक्रिया करण्यात आणि त्यांचा सामना करण्यात मदत होऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.