Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार!
    राजकारण

    महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार!

    नेत्यांचा विश्वास : मेळाव्यात 100 टक्के मतदानाचा निर्धार
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 14, 2026No Comments147 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी येथे महायुतीचा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील 54 अपक्ष सदस्य कोणत्याही पक्षाचे नसले तरी ते आपल्या विचारांचे आहेत. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित आहे, असा विश्वास व्यक्त केला.

    या मेळाव्यात नगराध्यक्ष, नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील म्हणाले की, महायुतीच्या उमेदवाराला शंभर टक्के पाठिंबा मिळणार असून जिल्ह्यात सर्वाधिक मतदान होईल. विधान परिषद निवडणुकीनंतर नव्याने निवडून येणाऱ्या सदस्यांनी छोट्या नगरपरिषदांकडे विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना उद्देशून आवाहन करताना सांगितले की, दि. 18 जून रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत शंभर टक्के मतदान पूर्ण झाले पाहिजे. एकही मत बाद होणार नाही याची दक्षता घ्यावी. जळगाव हा महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि तो या निवडणुकीतून पुन्हा सिद्ध करून दाखवायचा आहे. श्री. महाजन पुढे म्हणाले की, जिल्ह्यात महायुतीकडे सुमारे 550 मतांचे बळ असून सर्वांनी एकजुटीने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे. ज्या नगरपालिकेचे मतदान सकाळी 10 वाजेपर्यंत शंभर टक्के पूर्ण होईल, त्या नगरपालिकेला विशेष प्रोत्साहन देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. मेळाव्यापूर्वी आदित्य लॉन्स येथे महायुतीच्या प्रमुख नेत्यांची कोअर कमिटी बैठक पार पडली. त्यानंतर नगराध्यक्ष, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला.

    या मेळाव्यास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अनिल पाटील, आमदार किशोर पाटील, उमेदवार नंदकिशोर महाजन व पदाधिकारी उपस्थित होते.

    मेळाव्यात बोलताना आमदार अनिल पाटील यांनी महायुतीने तळागाळातील कार्यकर्त्याला प्रतिनिधित्वाची संधी दिल्याचे सांगितले. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी जबाबदारी ओळखून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणारा उमेदवार जळगाव जिल्ह्यातील असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये महायुतीच्या बाजूने अनुकूल वातावरण असून 18 जूनची निवडणूक महायुतीचा विजय अधिकृत करणारी ठरेल. जळगाव हा महायुतीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करण्याची ही संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif