लोकशाही संपादकीय लेख
2017 मध्ये नाशिक येथे बारा वर्षानंतरचा सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्यानिमित्त विकासाच्या संदर्भात नाशिकचा चेहरा मोहरा बदलणार आहे. प्रयागच्या धरतीवर कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येणार आहेत. भाविकांची संख्या लक्षात घेऊन त्यांच्या दर्शनाची, अंघोळीची आणि सुरक्षेच्या दृष्टीने काही गोष्टी लक्षात घेऊन तसा प्लॅन आतापासूनच केला जात आहे. गेल्या बारा वर्षापूर्वी झालेल्या कुंभमेळ्यासाठी जेवढे भाविक नाशिक येथे आले होते, त्यांच्या चार पटीने जास्त भाविक येथे कुंभमेळ्याला नाशिक येथे येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सर्व घाटांची व्यवस्था करण्यात येत असून नव्याने एक घाट निर्माण करण्यात येत असून, तेथे काही भाविकांना अंघोळीची व्यवस्था करण्यात येत आहे. नवा घाट करण्यासाठी जमिन अधिग्रहित करण्यात येत असून, येथे आखाडा समितीची संमती घेऊन तो घाट निर्माण करण्यात येत आहे. आखाड्याचे साधू जर या घाटाला परवानगी देतील तर आणि साधू जर येथे अंघोळ करत असतील तर भाविक आपोआप अंघोळीला जातील. आखाडा समितीच्या परवानगीने हे घाट निर्माण करण्यात येत आहेत. आता नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जागा तेवढीच असून त्या जागी भाविक मात्र चार पटीने जास्त येणार आहेत. त्यांची गैरवस्था व्हायला नको म्हणून आहे त्या जागेवर किंबहुना घाटासाठी थोडी जागा घेऊन त्या ठिकाणी सिंहस्थ मेळाव्याची व्यवस्था करण्यात येत आहे. सिंहस्थ कुंभ मेळाव्याचे प्रमुख पालकमंत्री गिरीश महाजन हे आतापासूनच या सर्व कामाला लागले आहेत. नाशिक मधील रामकुंडा मध्ये जास्तीत जास्त भाविकांना स्थान करता यावे, यासाठी नव्याने बांधकाम करून तयार करण्यात येत आहे. तर त्र्यंबकेश्वर नाशिक येथील कुंडाची दुरुस्ती करून येथे भाविकांना सोयीचे स्नान करता येईल, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. या कुंभाला जोडून एक नवा घाट बांधला जात आहे. त्यामुळे चार पटीने जास्त येणाऱ्या भाविकांची सोय होऊ शकेल. हे झाले कुंभच्या बाबतीत व्यवस्थित आयोजन. त्या व्यतिरिक्त भाविक नाशिक कुंड ते त्र्यंबक कुंड आणि नवा घाट यांना जोडणारे रस्ते एकदम चकाचक करण्यात येत आहेत. जेणेकरून वाहतुकीला कुठलाही अडथळा निर्माण होता कामा नये. त्याचबरोबर नाशिक शहरासाठी 76 किलोमीटरचा रिंग रोड तयार करण्यात येत आहे. नाशिकच्या सभोवती 76 किलोमीटरचा रिंग रोड म्हणजे नाशिकची परिक्रमा असेल. या परिक्रमेत एकूण नाशिक परिसरासह अनेक गावांचा समावेश असणार आहे. त्यासाठी काही जमीन संपादित करण्याची कामगिरी चालू असून काही पट जमिनीला भाव देण्याचा प्रस्ताव सुद्धा कुंभमेळा समितीकडे आहे. त्यामुळे जमिनीमुळे काम अडकलेले आहे, असे होता कामा नये म्हणून नाशिकचा रिंग रोड मोठ्या प्रगती पथावर असून तो परिक्रमेचा भाग राहणार आहे. तो मागील कुंभमेळ्याच्या वेळी नव्हता तो यंदाच्या कुंभमेळ्यात तयार करण्यात येत आहे.
सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नाशिक सर्कल येथील द्वारका सर्कल ते नाशिक रोड हा आठ किलोमीटर इतक्या अंतराच्या रस्त्याचा चेहरा मोरा बदलणार आहे. आठ किलोमीटर द्वारका सर्कल नाशिक रोड ते रेल्वे स्टेशन रोड हा रस्ता दहा पदरी होणार आहे. एकीकडे पाच पदरी तसेच दुसरीकडे पाच पदरी आणि मध्यभागी मेट्रोचे पूल बांधण्यात येतील, अशी व्यवस्था असेल आठ किलोमीटर रस्त्यात तीन ते चार ठिकाणी अंडर बायपास रोड असतील, जेणेकरून रस्त्यावर अडथळे निर्माण होणार नाहीत. दोन्ही बाजूला पाच पदरी रस्त्यामुळे बस स्थानक सिन्नरकडे जाणारी वाहतूक आणि द्वारका सर्कल वरून धुळ्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत वाढ होईल, म्हणजे द्वारका सर्कल ते नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर कसलाही वाहतुकीचा अडथळा येणार नाही. त्यानंतर नाशिक शहरातील अंतर्गत रस्ते सुधारण्याचे काम सुद्धा हाती घेण्यात आले आहे. शहरातील सर्व रस्ते चकाचक करण्यात येणार आहेत. रस्त्यांबरोबर शहरातील सर्व चौक सुशोभीत करण्यात येणार आहेत. त्यामुळे नाशिक हे पूर्वीचे नाशिक आहे की नव्याने बांधलेले नाशिक आहे, याची तुलना होणार आहे. काहीही असो बारा वर्षानंतर येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिकचा बदल महत्त्वाचा आहे. प्रयागराज येथे एवढी मोठी व्यवस्था करून सुद्धा चिंगराचींगरी झाली तशी अवस्था होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे…!