Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    • भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!
    • पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
    • पाकिस्तानी सैन्याकडून थेट लोकांच्या घरात घुसून गोळीबार
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»भुईकोट किल्ल्यावर राजा शिवछत्रपती परिवारातर्फे स्वच्छता
    जळगाव जिल्हा

    भुईकोट किल्ल्यावर राजा शिवछत्रपती परिवारातर्फे स्वच्छता

    ऐतिहासिक परिसर झाला स्वच्छ, सुंदर : ८६ वी स्वच्छता मोहीम
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 30, 2026Updated:March 30, 2026No Comments163 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पारोळा येथील पुरातन भुईकोट किल्ल्यात दि २९ रोजी राजा शिवछत्रपती परिवाराच्या वतीने भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गड-किल्ले संवर्धनाचे पवित्र कार्य करणाऱ्या ‘राजा शिवछत्रपती परिवार, जळगाव’ यांच्या वतीने दि. २९ मार्च रोजी पारोळा येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर ८६ वी स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबवण्यात आली. या परिवाराने आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध गड-किल्ल्यांवर सातत्याने स्वच्छता आणि संवर्धन मोहिमा राबवून शिवकार्याचा वारसा जपला आहे.

    सकाळी ठीक ८ वाजता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ यांच्या जयघोषाने संपूर्ण किल्ला परिसर दणाणून गेला होता. किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी उपस्थित ५५ ते ६० मावळ्यांनी मोठ्या उत्साहात श्रमदान केले. किल्ल्याच्या बुरुज व तटबंदीला धोकादायक काटेरी झाडे, अनावश्यक झुडुपे आणि साचलेला पालापाचोळा एकत्रित गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमेमुळे किल्ल्यातील बालेकिल्ल्याचा ऐतिहासिक परिसर स्वच्छ आणि सुंदर झाला आहे.

    सध्या पारोळा भुईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम अतिशय सुंदर, सुबक आणि नक्षीदार पद्धतीने करण्यात येत आहे. हे काम पाहून किल्ल्याचे मूळ वैभव पुन्हा उजळून निघत असल्याचे समाधान शिवप्रेमींनी व्यक्त केले. मात्र, हे सुशोभीकरण टिकवण्यासाठी आणि किल्ल्याचे पावित्र्य जपण्यासाठी पर्यटकांनी व स्थानिक नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. हे सुशोभीकरण आणि किल्ल्याचे पावित्र्य जपले पाहिजे, असे आवाहन यावेळी ‘राजा शिवछत्रपती परिवार’च्या वतीने करण्यात आले. या ८६ व्या मोहिमेसाठी जळगावसह धुळे, मुकटी, चोपडा, भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर, बहादरपूर आणि स्थानिक पारोळा परिसरातील मावळे उपस्थित होते. या मावळ्यांसाठी काही दानशूर शिवप्रेमींनी स्वखर्चाने चहा, पाणी, नाश्ता आणि उन्हाचा तडाखा लक्षात घेता ताकाची उत्तम व्यवस्था केली होती. राजा शिवछत्रपती परिवाराच्या वतीने आतापर्यंत अनेक गड-किल्ल्यांवर अशा मोहिमांचे आयोजन करण्यात आले असून, किल्ल्यांचे संवर्धन करणे हेच छत्रपती शिवाजी महाराज व इतर महान विभूतींना दिलेले खरे ‘अभिवादन’ आहे. या कार्यातूनच महाराज व महान विभूतींवरील आपली निष्ठा व प्रेम दिसून येते, असे मत यावेळी उपस्थित मावळ्यांनी व्यक्त केले. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026

    पाच महिन्यांची गर्भवती महिला अचानक कोसळली

    November 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif