३० नोव्हेंबर पासून नव्या आसमानी संकटाची टांगती तलवार

महाभयंकर फेंगल चक्रीवादळाचा देशाला गंभीर इशारा

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

डिसेंबर महीन्यात हवामान विभागाने मोठा गंभीर इशारा दिला आहे. देशातील मैदानी भागात लवकरच कडाक्याची थंडी पडणार असून येथे, फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. फेंगल चक्रीवादळामुळे देशातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यानंतर हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात 30 नोव्हेंबरपासून हिमवृष्टी आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

फेगल चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये दिसू शकतो. त्याच्या प्रभावामुळे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तापमानात मोठी घसरण होऊ शकते. ३ डिसेंबरपासून धुके वाढण्याची आणि तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या चक्रीवादळामुळे येत्या ४८ तासांत जोरदार वारे आणि पाऊस पडू शकतो.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात निर्माण झालेला दबाव गेल्या ६ तासांत ताशी 7 किमी वेगाने उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकला. शुक्रवारी चक्रीवादळ पाँडिचेरी आणि चेन्नईपासून 400 किमी अंतरावर आहे. ते लवकरच पुढे  सरकण्याची आणि 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 55-65 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान उत्तर तामिळनाडू-पुडुचेरी किनारे ओलांडून पुढे जाण्याची शक्यता आहे.

हावामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 29 नोव्हेंबर के 2 डिसेंबरपर्यंत तामिळनाडू, पाँडिचेरी, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काही भागांत मध्यम पाऊस होऊ शकतो. तसेच काही ठिकाणी मेघगर्जनाही होऊ शकते. तेलंगणा आणि केरळमध्ये 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान, किनारपट्टी आणि उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये 1 ते 2 डिसेंबर दरम्यान पाऊस पडेल.

हवामान विभागाच्या सांगण्यानुसार, 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी उत्तर तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 29 नोव्हेंबर रोजी दक्षिण आंध्र प्रदेशात काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी केरळ आणि कर्नाटक, 30 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारी भागात आणि 1 डिसेंबर रोजी तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.