Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»युरोपमधला हिरवट वटवट्या वरणगावात दाखल
    जळगाव जिल्हा

    युरोपमधला हिरवट वटवट्या वरणगावात दाखल

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 23, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    युरोप देशातून उडत उडत अफगाणिस्तान, बलुचीस्तान, हिमालयमार्गे थेट आयुध निर्माणीच्या वसाहतीतील झाडावर लाजाळू तितकाच चंचाल, हिरवट वटवट्या (ग्रीनिश् वार्बलर) हा पक्षी दाखल झाल्याचे छायाचित्र पक्षी अभ्यासक अनिल महाजन यांनी टिपले.

    झाडाच्या उंच भागावरील पानातील कोडीष्ठाने शोधुन खाणारा, चिमणीपेक्षाही लहान आकाराचा हिरवट रंगाचा झाडाच्या फिंदांवर पानाआड बसला की दिसण्यास तेवढाच अवघड. मात्र तितकाच चंचल व लाजाळू कुणाचीही चाहुल लगताच भुर्रकन उडून जाणारा हिरवट वटवटया (ग्रीनिश वार्बलर) हा पक्षी. रविवारची सुट्टी असल्याने चातक निर्सग सर्वधन संस्थेचे प्रमुख पक्षी अभ्यासक अनिल महाजन हे कॅमेरा घेऊन आपल्या अंगणात उभे होते. यांच्या रोज कानी पडणाऱ्या पक्षाच्या आवाजा पेक्षा वेगळा आवाज कानी पडताच शेजारच्या उंच झाडाकडे नजर टाकली तर वटवट्याची हालचाल व आवाज ऐकू आला.

    दबक्या पावलांनी घराच्या छतावर जाऊन शेजारच्या झाडाच्या दिशेने कॅमेरा ताणुन त्याची छबी टिपण्याचा बराच प्रयत्न केला, मात्र त्याला चाहुल लागताच लाजून या झाडावरून त्या झाडावर असा लंपणडाव चालला. बराच वेळ झाला तरी वटवट्या कॅमेऱ्यात त्याची छबी कैद होत नव्हती. मात्र बऱ्याच वेळा नंतर शेवटी त्याला कॅमेऱ्यात त्याला टिपले. साधारणपणे हिवाळ्याच्या चाहुल लागताच विदेशातून बरेच विदेश पक्षी आपल्या अन्नाच्या शोधात भरतात येत असतात व मार्च नंतर ते परतीचा प्रवास करीत असतात. निर्सगरम्य हतनुर जलाशयावर मोठ्या संख्येने वेगवेगळे विदेश ग्रीनिश वार्बलर वटवट्या येतात. त्या पैकी हिरवट वटवट्याचे आगमन झाले असल्याचे अनिल महाजन यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026

    मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!

    August 8, 2026

    धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदील

    August 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif