अन, मुलीचं नावचं “शिवसेना” ठेवलं…

0

 

रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क:

‘शिवसेना’ हा पक्ष एका वेगळ्याच कारणासाठी तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या एका कट्टर शिवसैनिकानं आपल्या मुलीचं नावच ‘शिवसेना’ ठेवलं आहे. याद्वारे त्यानं बाळासाहेबांप्रती एक प्रकारे कृतज्ञताच व्यक्त केली आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड येथील पांडुरंग वाडकर यांनी आपल्या मुलीचं नाव “शिवसेना” असं ठेवलं आहे. पण “शिवसेना” हे नाव आपल्या मनामध्ये का आलं हे सांगताना पांडुरंग वाडकर म्हणतात, “माझी मुलगी जन्माला यायच्या आदल्या रात्री स्वतः बाळासाहेब ठाकरे माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला हे नाव सुचवलं. त्याअनुषंगानं मी माझ्या मुलीचं नाव शिवसेना असं ठेवलं. वाडकर हे कट्टर शिवसैनिक आहेत, त्यामुळंच आपल्या पक्षाचं नाव कायमच आपल्या तोंडी असावं तसेच समोर असावं यासाठी त्यांनी ही भूमिक घेतली. पांडुरंग वाडकर हे उपसरपंच राहिले आहेत.

दरम्यान, या नामकरणविधी सोहळ्याला आलेले कार्यकर्ते आणि पाहुण्यांनी देखील मुलीच्या या नावाचं स्वागत केलं आहे. तसेच महाराष्ट्रात अशी पहिलीच घटना असेल की कोणी आपल्या मुलीचं नाव शिवसेना ठेवलं असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.