लोकशाही न्यूज नेटवर्क
राहत्या घराच्या परिसरात खेळत असलेल्या सात वर्षीय मुलीला शेजारणीने मारहाण केली होती. याचा राग आल्याने दोन कुटुंबात तुंबळ मारामारी झाल्याची घटना उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्यची नोंद केली आहे.
उल्हासनगर कॅम्प चार मधील सुभाष टेकडी परिसरात साईबाबानगर आहे. साईबाबा नगर परिसरामध्ये वास्तव्यास असलेले मनोज जाधव कुटुंबासह राहतात. त्यांची सहा वर्षाची मुलगी सृष्टी ही परिसरातील लहान मुलांसह खेळत होती. त्यावेळी तिथेच राहणाऱ्या जयश्री जगताप या तिथे आलय आणि त्यांनी सृष्टी हिच्या कानशिलात लगावली. याबाबत सृष्टीने घरी आल्यावर ईला सांगितले.
यानंतर सृष्टीच्या आई तारा जाधव यांनी जयश्री यांना मुलीला का मारले म्हणून जाब विचारला. या कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले. तर सदर घटनेची तक्रार करण्यासाठी सृष्टीचे आई- वडील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गेले. मात्र पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा घेत त्यांना घरी पाठवून दिले. त्यानंतर जयश्री जगताप यांचे पती अक्षय रात्री दहा वाजताच्या सुमारास कुटुंबासह मनोज जाधव यांच्या घरासमोर आला. जगताप कुटुंबियांनी मनोज जाधव यांच्याशी वाद घातला.
दोन्ही कुटुंबामधील हा वाद विकोपाला गेल्यानंतर मनोज आणि त्यांची पत्नी तारा यांना जगताप कुटुंबीयांनी मारहाण केली. या मारहाणीत मनोज यांच्या डोक्याला जबर मार लागला. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. तर पोलिसांनी जगताप कुटुंबावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनोज जाधव यांच्या पत्नी तारा जाधव यांनी केली आहे.