Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»शेतकरी मेळावा रद्द करावा, अन्यथा गोंधळ अटळ
    राजकारण

    शेतकरी मेळावा रद्द करावा, अन्यथा गोंधळ अटळ

    मनोज जरांगे पाटील यांचा एकनाथ शिंदेंना इशारा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 30, 2026No Comments256 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. एकीकडे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असताना दुसरीकडे परभणीत एकनाथ शिंदेंचा शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदेंना मोठा इशारा दिला आहे. मेळावा रद्द केला नाही, तर उपमुख्यमंत्र्यांना नांदेड विमानतळावर जाण्याची पंचाईत होईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. जरांगे यांच्या इशाऱ्यावर शिंदे गटाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

    मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या पहिल्या दिवसापासूनच आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक येऊ लागले आहेत. मुंबईत आंदोलनाची परवानगी न मिळाल्यानंतर जरांगे यांनी अंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली. उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिंदे गटाने परभणीतील शेतकरी मेळावा रद्द करावा, अन्यथा गोंधळ अटळ आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील याांनी दिला. त्यावर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले, ‘मनोज जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भात शिंदेसाहेबांनी अनेक निर्णय घेतले. त्यांच्यासाठी एकनाथ शिंदेंनी पुढाकार घेतलाय. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं काम सरकार करत आहे’.

    मनोज जरांगे यांच्या इशार्‍यावर खासदार म्हस्के म्हणाले, ‘मी या संदर्भात माहिती घेतो. मनोज जरांगे पाटील यांचा आम्ही आदर करतो. मला वाटत नाही, असं त्यांनी म्हटलं असेल. त्या संदर्भात आमची काही मंडळी आहेत. प्रसाद लाड आणि इतर मंडळी त्यांच्याशी संपर्क साधतात. त्यांच्याशी मी बोलतो. नक्कीच भूमिका जाणून घेतो’.

    एकनाथ शिंदे यांचा परभणीत होणारा शेतकरी मेळावा रद्द करा, अशी धमकी जरांगे पाटील यांनी दिल्यानंतर परभणीत पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. खासदार संजय जाधव यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मराठा आंदोलकांकडून सभा उधळणार असल्याच्या व्हायरल मेसेजनंतर खासदार संजय जाधव यांच्या घरासमोरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या

    September 4, 2026

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    September 4, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif