Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»कुटुंब मंदिरात पोहोचताच बसला भयंकर धक्का!
    गुन्हे वार्ता

    कुटुंब मंदिरात पोहोचताच बसला भयंकर धक्का!

    भुसावळमध्ये मंदिराच्या मुख्य पूजार्‍याची निर्घृण हत्या
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 29, 2026Updated:June 29, 2026No Comments876 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    भुसावळ शहरालगत झेडटीआरआय बोगद्याजवळील मंदिराचे मुख्य पूजारी यांची अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात जड वस्तूने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२९ जून) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे भुसावळ शहरासह रेल्वे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला आहे.

    संतोष रघुवीर मंचल (वय ५५, रा. झेडटीआरआय परिसर, भुसावळ) असे मृत पूजार्‍याचे नाव आहे. आरपीडी रस्त्यालगत लष्करी डेपोपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तीन मंदिरांमध्ये ते गेल्या अनेक वर्षांपासून नियमित पूजा-अर्चा करत होते. सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचे कुटुंबीय नेहमीप्रमाणे मंदिरात गेले असता, मंदिराच्या आवारात संतोष मंचल यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या डोक्यावर जड व टणक वस्तूने जबर प्रहार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि शहर पोलिसांना कळविण्यात आले.

    माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, शहर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, हवालदार संदीप पालवे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. ही हत्या चोरीच्या उद्देशाने करण्यात आली की वैयक्तिक वैमनस्य, आर्थिक व्यवहार किंवा जमीन वादातून घडली, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. तपासासाठी जळगाव येथून ठसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळावरील महत्त्वाचे नमुने संकलित करण्यात आले आहेत. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली असून, भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif