चालू गाडी; वाहनचालकाला ह्रदयविकाराचा झटका आणि..

गुजरातच्या गाडीचा नंदुरबार जवळ भीषण अपघात

0

 

नंदुरबार

बदलत्या वातावरणामुळे ह्रदयविकाराचे तरुणांमधील प्रमाण मोठ्या प्रमाणवर वाढले आहे. असे प्रकार अनेक वेळा घडतांना दिसून येतात. नंदुरबारमध्ये असाच हृदयविकाराचा झटका येऊन एक विचित्र अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. गुजरातमधील एका कार चालकाला गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर गाडीवरील त्याचे नियंत्रण पूर्ण गेले. अनियंत्रित असलेल्या गाडीने रस्त्यावरील चौघांना उडवले. त्यात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहे. ह्रदयविकार आलेल्या कार चालकाचाही मृत्यू झाला आहे.

 

अशी घडली घटना..

गुजरातमधील GJ 26 AE 5786 क्रमांकाची कार नंदुरबारजवळून जात होती. त्यावेळी वाहनचालकाला चालत्या गाडीत ह्रदयविकराचा झटका आला. त्यात कार चालकाचे निधन झाले. त्यानंतर कार अनियंत्रित झाली. अनियंत्रित झालेल्या या गाडीने रस्त्यावरील चौघांना उडवले. या अपघातमध्ये दोघांचा मृत्यू झाला. तसेच एका साठ वर्षीय भंगार विक्रेत्याचाही जागीच मुत्यू झाला. रस्त्याने पायी जाणारे आई आणि मुलगा गंभीर जखमी झाला आहे. रस्त्याला एके ठिकाणी धडक दिल्यानंतर गाडी थांबली.

 

या अपघाताची माहिती मिळताच नंदुरबार पोलिसांनी घटनास्थळी पोहचले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.

Leave A Reply

Your email address will not be published.