अवघ्या २ मार्कांनी स्वप्न राहिले अपूर्ण

चिठ्ठी लिहित तरुणाने संपविले आयुष्य

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

अवघे २ मार्क्स कमी पडल्याने पोलीस भरती हुकली. त्यामुळे नैराश्येत येऊन २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लातूमध्ये घडली आहे. ‘आरक्षण असतं तर पोलीस भरतीत लागलो असतो, आई मला माफ कर…’, अशी चिठ्ठी लिहित नागेश यादव या तरुणाने आपली जीवन यात्रा संपवली. या तरुणाच्या आत्महत्येमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.

अनेकदा प्रयत्न करूनही पोलीस भरतीचे स्वप्न अपूर्ण राहिलं. तर यावेळी वेटिंगमध्ये असूनही केवळ २ मार्कांनी पोलीस भरती हुकली याच वैफल्यातून लातूरमध्ये तरुणाने आत्महत्या केली. औसा तालुक्यातल्या बोरफळ इथे ही घटना घडली. नागेश यादव (२३ वर्षे) असं या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने शेतामध्ये जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. नागेशने ‘आरक्षण असतं तर नोकरी लागली असती. आई मला माफ कर..’, अशा आशयाची चिठ्ठी लिहित आत्महत्या केली.

नागेश यादव या तरुणाच्या घरची परिस्थिती खूपच हलाखीची होती. त्याच्या कुटुंबाकडे फक्त एक एकर शेती आहे. मुलाने पोलीस व्हावं यासाठी त्याच्या आईने खूप मेहनत घेतली आणि खर्चही केला. पाच ते सहा परीक्षांमध्ये एक ते दोन गुणांनी हुलकावणी दिली. यावेळी नागेश वेटिंगमध्ये होता पण दोन मार्क्सने त्याची यावेळी देखील भरती होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलं. त्यामुळे नागेश नैराश्येत गेला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले.

नागेश आपल्या स्वतःच्या शेतात कोणालाही न सांगता गेला. त्याने शेतामधील एका झाडाला गळफास घेत जीवन यात्रा संपवली. नागेशच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. नागेशच्या संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.