लोकशाही न्यूज नेटवर्क
मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशच्या अनेक जिल्ह्यात सध्या हाहाकार निर्माण झाला आहे. सतत पडणाऱ्या पावसाने अनेक पुल खचतायत. दरडी कोसळतायत. अनेक महामार्ग वाहून जातायत. त्यामुळे अनेक शहरांचा संपर्क तुटला आहे. पावसाचा जोर रोज वाढतच चालला आहे. हिमाचलच्या मोठ्या नद्यांसह अनेक छोट्या-मोठ्या नद्यांना सुद्धा पूर आलाय. या दरम्यान कुल्लू जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. ढग फुटीमध्ये येथे बरच काही उध्वस्त झाले आहे.
कुल्लूच्या मलाणा भागात रात्री उशिरा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पार्वती नदीला पूर आला. त्यामध्ये अनेक घर, गाड्या वाहून गेल्या. विशेष म्हणजे 4 मजली इमारत सात सेकंदांच्या आत पार्वती नदीमध्ये सामावून गेली. बिल्डिंग कुठे वाहून गेली, समजलच नाही. या घटनांचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल देखील होत आहेत. एकट्या कुल्लू जिल्ह्याबद्दल बोलायच झाल्यास इथे ब्यास आणि पार्वत नदी धोक्याच्या पातळी ओलांडून वाहत आहे. मलाणा गावातील पॉवर प्रोजोक्टचा डॅम सुद्धा ओव्हर फ्लो झालाय.
शेकडो लोकांनी पळ काढून आपले प्राण
सर्वाधिक नुकसान निरमंड उपमंडलच्या बागीपुलमध्ये झालं आहे. इथे कुर्पन खड्ड येथे पूर आला. त्यात नऊ घर वाहून गेली. एका खोलीतील संपूर्ण कुटुंबच पुरात वाहून गेलं. सिमला जिल्ह्यात रामपुरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय. येथे 19 लोक बेपत्ता आहेत. इथे सुद्धा ढगफुटी झालीय. सिमलाचे डेप्युटी कमिश्नर अनुपम कश्यप यांनी ही माहिती दिली. परिस्थिती इतकी भीषण होती की, रात्रीच्या अंधारात आसपास राहणाऱ्या शेकडो लोकांनी पळ काढून आपले प्राण वाचवले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची टीम घटनास्थळी पोहोचली.
पुढील ३६ तास अधिक धोक्याचे
हिमाचल प्रदेशात पुढच्या 36 तासात 10 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने बुलेटिन जारी करताना बिलासपुर, चंबा, हमीरपुर, कांगड़ा, कुल्लू, मंडी, शिमला, सिरमौर, सोलन आणि ऊना येथे आज रात्री व उद्या दिवसभर पाऊस कोसळण्याचा इशारा दिला आहे. यामुळे भूस्खलन आणि पुराच्या घटना वाढू शकतात. हिमाचल प्रदेश फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना खबरदारीचा इशारा दिला आहे.