Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    राजकारण

    अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला

    नाशिक पालकमंत्रिपद गिरीश महाजन : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 17, 2026No Comments258 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अखेर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांची नावं जाहीर झाली आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून गेल्या अनेक दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आदिती  तटकरे या उत्सुक होत्या तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भरत गोगावले यांनी पालकमंत्रिपदावर दावा केला होता, अखेर रायगडचं पालकमंत्रिपद हे भरत गोगावले यांना मिळालं आहे.

    तर दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी देखील रस्सीखेच सुरू होती, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीकडून देखील दावा करण्यात आला होता. मात्र अखेर हा तिढा सोडवण्यात आता यश आलं आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर आता गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते पुंढरपूरमध्ये बोलत होते.

    पंढरपुरात आल्यानंतर देवाचे दर्शन करताना मला ही बातमी समजली. त्यामुळे मला पांडुरंग पावला आहे. आपण मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. नाशिक मध्ये खड्ड्यांसाठी काही लोक आंदोलन करत आहेत, मोर्चे काढत आहेत. नाशिकचे रस्ते सिमेंटचे करायचे आहेत. थोडा त्रास सहन करावा लागेल मात्र नाशिक स्वच्छ आणि सुंदर होईल. अगोदर कुंभमेळा मंत्री होतो. आता पालकमंत्री झालो असल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपुरात व्यक्त केले आहे. पंढरपुरात विठ्ठल दर्शन  झाल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत महाजन यांनी आनंद व्यक्त केला आहे.

    दरम्यान दुसरीकडे भरत गोगावले यांच्याकडून आधीच पालकमंत्रिपदाचे संकेत देण्यात आले होते. रायगडचे पालकमंत्री आपणच होणार असं त्यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं. अखेर आज त्यांचं भाकीत खरं ठरलं आहे. रायगडचे नवे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांचं नाव जाहीर झालं आहे. भरत गोगावले हे आज दिल्लीमध्ये आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif