या व्यक्तीला न्यायालयाने दिली चक्क ८,६५८ वर्षांची शिक्षा…

0

 

आंतरराष्टीय, लोकशाही न्यूज नेटवर्क:

महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी न्यायालयाने मुस्लिम धर्मगुरू अदनानला ८,६५८ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तुर्कीचे धार्मिक नेते अदनान ओक्तार हे वादग्रस्त धार्मिक नेते राहिले आहेत. एका टीव्ही शो वर लोकांना जीवनशैलीबद्दल सांगतो. त्याच्या टीव्ही शोमध्ये मुली कमी कपड्यात येतात. अलीकडेच त्याच्यावर महिलांचे लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत.

या कारणास्तव, तिथल्या न्यायालयाने त्याला लैंगिक छळ केल्याप्रकरणी 8,658 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. अदनानवर महिलांसोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे. याआधीही न्यायालयाने अदनानला तुरुंगाची शिक्षा सुनावली आहे. अदनान एक टीव्ही शो होस्ट करतो. त्या शोमध्ये अनेक मुली उपस्थित असतात, ज्या खूप मेकअप करतात आणि कमी कपडे घालतात. अदनान या मुलींना किटन म्हणतो.

६६ वर्षीय अदनान हा धर्मगुरू आहे, तो आपल्या मस्तीत आयुष्य जगतो, गेल्या वर्षीही त्याच्यावर लैंगिक छळ, अल्पवयीन मुलींचे शोषण अशा प्रकरणांचा सामना करावा लागला होता. याच कारणामुळे अदनानला 1,075 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, अदनानवर राजकीय आणि लष्करी हेरगिरीचाही आरोप आहे. अदनान इस्तंबूलमध्ये राहतो. येथे तो टीव्ही शो करतो आणि आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवतो. याशिवाय अदनानची जीवनशैली वेगळी आहे. तो नेहमी पार्टी करतो. देश विदेशातील सेलिब्रिटींना आमंत्रित करतो.

Leave A Reply

Your email address will not be published.