Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»मातब्बर नेत्यांचे जिल्हा बँकेवर जाण्याने सहकार समृद्ध व्हावे!
    संपादकीय

    मातब्बर नेत्यांचे जिल्हा बँकेवर जाण्याने सहकार समृद्ध व्हावे!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 8, 2026No Comments248 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवण्यात यावी, यासाठी दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. यासाठी सोसायटी मतदारसंघातून आपले ठराव करण्याचा धडाका सुरू केला आहे. बँकेच्या या निवडणुकीसाठी आपल्याला निवडणूक मैदानात उतरता यावे, यासाठी जिल्ह्यातील तीन मंत्री व एक केंद्रीय राज्यमंत्र्यांचा त्यात सहभाग आहे.

    जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यातील हिवरखेडा सोसायटीतून ठराव केला आहे, तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खेडी, तालुका जळगाव येथून ठराव केला असल्याचे समजते. माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी अमळनेरात व वासरे, तालुका अमळनेर येथून ठराव केला आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी कोथळी, तालुका मुक्ताईनगर येथून ठराव केला आहे. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी हिंगोणे येथून, तर आमदार किशोर पाटील यांनी अंतुरली, तालुका पाचोरा येथून तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी मेहरून, तालुका जळगाव येथून ठराव केला आहे.

    त्याचबरोबर पारोळ्याचे आमदार अमोल पाटील यांनी पत्नी मृणाल पाटील व आईचा, तर माजी मंत्री अनिल पाटील यांनी पत्नी जयश्री पाटील यांचा तसेच गुलाबराव देवकर यांनी स्वतःच्या ठरावाबरोबर मुलगा विशाल देवकर यांचा ठराव केला आहे. तसेच आमदार राजू मामा भोळे यांनी पुत्र नगरसेवक विशाल भोळे यांचा, तर सुनील महाजन दांपत्याचाही ठराव झाल्याचे कळते. बँकेचे विद्यमान चेअरमन संजय पवार आणि पत्नी सोनल पवार यांचा, तर गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रताप पाटील यांचाही ठराव झालेला आहे, असे कळते. अजून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुकीची अधिकृत प्रक्रिया सुरू होण्याआधीच नेत्यांच्या निवडणुकीच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. मातब्बर नेत्यांचा जिल्हा बँकेवर कब्जा राहील, या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील संचालक मंडळावर एक नजर टाकली, तर तेच तेच नेते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहतील, असे चित्र दिसते आहे. त्यात आता तरी तूर्त विरोधी पक्षाला काही थारा मिळणार नाही, अशी परिस्थिती दिसते आहे.

    मागील निवडणुकीत समझोता झाला होता. त्यानुसार सुरुवातीला गुलाबराव देवकर हे चेअरमन झाले होते. परंतु त्यांना बँकेत महायुतीचे वर्चस्व वाढले आणि अजितदादा हयात असताना त्यांच्या नेतृत्वात गुलाबराव देवकरांना राजीनामा द्यावा लागला आणि बँकेच्या चेअरमनपदी संजय पवार यांची वर्णी लागली. तेव्हापासून ते सतत चार वर्षे, म्हणजे आतापर्यंत बँकेच्या चेअरमनपदी आहेत. व्हाइस चेअरमनपदी पारोळ्याचे आमदार अमोल पाटील हे काम पाहत आहेत. यापूर्वी रोहिणी खडसे पाच वर्षे बँकेच्या चेअरमनपद सांभाळत होत्या. त्यांच्या कारकिर्दीत बँकेची आर्थिक स्थिती मजबूत झाली होती. एनपीएतून बाहेर काढण्यात त्यांना यश आले होते. परंतु दुर्दैवाने दुसऱ्यांदा त्या बँकेच्या चेअरमन होऊ शकल्या नाहीत. परंतु त्यांनी बँकेची धुरा अत्यंत काटकसरीने सांभाळली.

    त्या कारकिर्दीत कसोदा येथील वसंत सहकारी साखर कारखाना व बेलगंगा सहकारी साखर कारखाना, चाळीसगाव, हे दोन साखर कारखाने खासगी मालकाला विकण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर गुलाबराव देवकर यांच्या कारकिर्दीत फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना खासगी मालकाला विकला गेला. संजय पवार चेअरमन असताना वसंत सहकारी साखर कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न झाला; पण ते शक्य झाले नाही. या उलट बँकेची जुनी मालकीची दगडी इमारत विकण्याचा घाट घालण्यात आला; पण तो यशस्वी झाला नाही. ती दगडी बँक आता बँकेची हेरिटेज म्हणून जपणूक करण्याचे ठरले. बँकेतील नोकरभरतीला संजय पवार यांच्या कारकिर्दीत हिरवा कंदील मिळाला, हे विशेष होय.

    आता जिल्ह्यातील मातब्बर नेते या बँकेत निवडणुकीच्या माध्यमातून जाण्याचा निर्णय घेत आहेत. निर्णय प्रक्रियेत फार मोठा सहभाग या नेत्यांचा राहणार आहे. दिग्गज नेते जर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गेले, तर बँकेचा कायापालट होण्यास त्यांची मदत होऊ शकते. परंतु नेत्यांच्या व्यतिरिक्त जर त्यांच्या नातेवाईकांच्या हातात ही बँक गेली, तर निर्णय प्रक्रियेत अडचण येण्याची दाट शक्यता आहे. अनुभवी नेत्यांचा बँकेतील सहभाग आणि अनुभवी नातेवाईकांचा सहभाग यामध्ये त्यांची बँकेवरील पकड कमी होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    जिल्ह्याला पूर्वीचे सहकार क्षेत्राचे वैभव प्राप्त करायचे असेल, तर वसंत सहकारी साखर कारखान्याचे पुनरुज्जीवन झाले पाहिजे. ते होऊ शकते. पश्चिम महाराष्ट्रात असे अनेक गाळात गेलेले साखर कारखाने पुन्हा जोमाने सुरू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कुणीतरी पुढाकार घेऊन राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून ते विकत घेऊन त्याला ऊर्जितावस्थेत आणता येईल. फक्त इच्छाशक्ती हवी आहे. काहीच करायचे नसेल, तर काहीही होणार नाही.

    उलट आज बँकेच्या ताब्यात कारखाना असल्यामुळे बँकेचा त्यावर आर्थिक बोजा पडत आहे. म्हणून त्याला ऊर्जितावस्थेत आणण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. बंद पडलेला बेलगंगा साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने संचालक मंडळाने प्रयत्न केले पाहिजेत. मुक्ताईनगर सहकारी साखर कारखाना तसेच रावेर येथील सहकारी साखर कारखानेसुद्धा पुन्हा कसे सुरू होतील, या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. फैजपूरचा मधुकर सहकारी साखर कारखाना सुरू होण्यास काय अडचण आहे, त्यातून मार्ग काढता येऊ शकतो आणि तो प्रश्न सुटून तो कारखाना सुरू व्हावा. म्हणजे सहकारातून जिल्ह्याला समृद्धी प्राप्त होईल. तसे केले गेले, तरच मातब्बर नेत्यांच्या बँकेत जाण्याचे श्रेय त्यांना मिळेल. अन्यथा ‘येरे माझ्या मागल्या’ सुरू राहील आणि यातून काहीही निष्पन्न होणार नाही.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!

    October 6, 2026

    नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?

    October 6, 2026

    शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर बँका जबाबदार राहतील!

    October 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif