चुंचाळे, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल तालुक्यातील चुंचाळे बोराळे गावासह गायरान, नायगाव हा रस्ता अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गाला जुळत असून सदर रस्त्याची पुन्हा दयनीय अवस्था झाली असून सदर रस्त्याकडे लोकप्रतिनिधिंनी लक्ष द्यावे, व अखंड रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सदर रस्ता अवघ्या काही वर्ष अगोदरच मा. जि. प. सदस्य यांनी त्यांच्या निधी अंतर्गत ९०० मिटर रस्ता केला मात्र काही दिवसातच या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र समोर आहे, तर मा. आमदार यांनी केलेल्या अर्ध्या रस्त्याचे पण तेच चित्र समोर येत आहे, सदर रस्त्यात एवढे खड्डे पडले आहेत कि, रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही, याच रस्त्या वरून नायगाव, मालोद, कासारखेडा आडगाव बसला धक्के खात जावे लागत आहे, याच रस्त्यासाठी अगोदर अनेक आंदोलन झाले आहेत, पुन्हा तेच स्थिती निर्माण होते का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
आता तरी चुंचाळे ते चुंचाळे फाटा हा अखंड रस्ता नवीन बनविण्याची मागणी ग्रामस्थासह सुज्ञ नागरीकाकडून होत आहे आता तरी सदर रस्ता हा चागल्या प्रतिचा बनवून द्यावा व वाहनधारकाना या गढ्ढेमुक्त करावे अशी मागणी होत आहे. अवघ्या काही दिवसातच ह्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांना आता अतिशय डोकेदुखी झाली आहे. साकळी, यावल कडे जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असून दुसरा पर्याय नाही म्हणून नागरिकांना दळण वळणासाठी मोठे संकट निर्माण झाले आहे, तर हा रस्ता बांधकान विभागाने, लोकप्रतिनिधिंनी जातीने लक्ष देत लवकर पूर्ण करावा अशी मागणी वाहन चालकासह सुज्ञ नागरीकाकडून होत आहे.