Saturday, January 28, 2023

सुरेश दादांच्या येण्याने शहराला पुन्हा गतवैभव – ना. गिरीश महाजन

- Advertisement -

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

ना. मंत्री गिरीश महाजन व आ. मंगेश चव्हाण आज रोजी माजी मात्री सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीसाठी पोहोचले. यावेळी त्यांनी सुरेश दादांच्यासमवेत स्नेह भोजनाचा देखील आस्वाद घेतला.

- Advertisement -

माजी मंत्री सुरेश दादा जैन हे दोन दिवसांपूर्वी जळगाव शहरात दाखल झाले आहेत त्यामुळे त्यांना भेटणाऱ्या आप्तेष्टांची व राजकीय वर्तुळातील पुढार्यांची एकच गर्दी होतांना दिसून येत आहे. त्यातच आज महाराष्ट्र राज्याचे ना. मंत्री गिरीश महाजन व आ. मंगेश चव्हाण हे त्यांच्या सदिच्छा भेटीला त्यांच्या निवासस्थानी गेले असता सुरेश दादा यांनी आ. मंगेश चव्हाण यांचा सत्कार केला. यावेळी मंगेश चव्हाण म्हणाले की दादांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत आले आहे.

यादरम्यान, गिरीश महाजन लोकशाही सोबत बोलतांना म्हणाले की, दादांच्या भेटीमागे कुठलाही राजकीय हेतू नाही, आमच्या कौटुंबिक संबधाखातर मी दादांच्या भेटीला आलो आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या सक्रीय राजकारणाविषयी बोलतांना म्हणाले की, दादांना आम्ही काय सांगावे. दादांच्या येण्याने शहराला पुन्हा गतवैभव मिळाले असल्याचेही ना. मंत्री म्हणाले.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे