द बर्निंग बस ; आगीत २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू

१२ जणांचे जीव थोडक्यात वाचले ; आंध्रातील कुर्नूल जिल्ह्यातील घटना

0

द बर्निंग बस ; आगीत २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू(पहा व्हिडिओ)

१२ जणांचे जीव थोडक्यात वाचले ; आंध्रातील कुर्नूल जिल्ह्यातील घटना

कुर्नूल (प्रतिनिधी) – आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे बंगळुरू-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघातात खासगी प्रवासी बसला लागलेल्या आगीत किमान २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असून, १२ प्रवासी खिडक्या फोडून बाहेर पडल्याने त्यांचे जीव थोडक्यात वाचले आहेत. या दुर्दैवी घटनेने परिसरात हाहाकार माजला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, कावेरी ट्रॅव्हल्सची ही खासगी बस हैदराबादहून बंगळुरूकडे जात होती. चिन्ना टेक्कुर गावाजवळ बसने एका दुचाकीला धडक दिली आणि लगेचच बसमध्ये भीषण स्फोट झाला. काही क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली. आग इतक्या झपाट्याने पसरली की अनेक प्रवाशांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही.

भीषण आगीत आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाल्याचे पुष्टी झाली आहे, तर अनेक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आग विझवण्यासाठी पोलिस आणि अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे.

या अपघातामुळे महामार्गावर बराच काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतांची ओळख पटवण्याचे कामही सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.