Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»संपादकीय»स्मार्ट मीटरचा भुर्दंड : अनेक ग्राहक त्रस्त!
    संपादकीय

    स्मार्ट मीटरचा भुर्दंड : अनेक ग्राहक त्रस्त!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 2, 2026No Comments483 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    जळगाव शहरात महावितरण कंपनीच्या वतीने सक्ती करून स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. या स्मार्ट मीटरमुळे अव्वाच्या सव्वा बिल ग्राहकांना येत आहे. त्यामुळे हेच स्मार्ट मीटरवाले ग्राहक रस्त्यावर उतरले असून, “आम्हाला हे बिल परवडणारे नाही. आम्ही एवढी मोठी रक्कम भरू शकणार नाही,” असा दावा करीत आहेत. स्मार्ट मीटर बसवण्याआधी लोकांना, म्हणजे ग्राहकांना, विश्वासात घेणे गरजेचे होते. परंतु महावितरणने तसे केले नाही. त्यांनी सक्तीने बसविण्याचा उद्योग सुरू केला. त्यामुळे आता त्यांचा भुर्दंड ग्राहकांवर पडत आहे. स्मार्ट मीटर हे त्यांना असह्य झाले आहे. हा प्रकार आता संपूर्ण शहरात स्मार्ट मीटर बसवायचे म्हटले तर किती त्रासदायक आहे. सुरुवातीला जे काही मीटर बसवण्यात आले, त्याबाबत त्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत वाईट येत असतील, तर शहरभर स्मार्ट मीटर बसवण्याचे कसे काय साध्य होईल? त्यामुळे हे स्मार्ट मीटर एकदा तपासून घेतले पाहिजे. ते कशा पद्धतीने रन होतात की नाही, त्याचा अंदाज घेऊन हे स्मार्ट मीटर बसवायला हवे होते. जेव्हा एखाद्या ग्राहकाचे बिल सरासरी दोनशे रुपये येते आणि स्मार्ट मीटरमुळे जर ते बिल चारशे रुपये येत असेल, तर हा अन्यायच आहे. त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊनच हे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम हाती घ्यायला हवे होते. अन्यथा अशा तक्रारी येतच राहणार आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!

    August 7, 2026

    रक्षा खडसेंच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी सर्वपक्षीय मोर्चा

    August 6, 2026

    सुनेत्रा पवारांवर ‘गुंगी गुडिया’चा काँग्रेसतर्फे हल्लाबोल!

    August 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif