Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»इमारत पेटली अन जीव वाचवण्यासाठी थेट सातव्या….
    अपघात

    इमारत पेटली अन जीव वाचवण्यासाठी थेट सातव्या….

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 10, 2025Updated:June 10, 2025No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राजधानी दिल्लीमध्ये अंगाचा थरकाप उडवाणारी घटना घडली आहे. इमारतीच्या सातव्या मजल्याला भीषण आग लागली. आगीपासून वाचण्यासाठी सातव्या मजल्यावरून तीन जणांना उडी मारल्याचं समोर आले आहे. या तिघांचाही मृत्यू झाला आहे. यामध्ये वडील आणि दोन मुलांचा समावेश आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. अग्निशामन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

    दिल्लीतील द्वारका सेक्टर-13 मध्ये आज सकाळी एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागली. आग इतकी भीषण होती की अनेक लोकांनी घाबरून इमारतीवरून खाली उड्या मारल्या. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात उपचारावेळी तीन जणांचा मृत्यू झाला. डीएफएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आग विझवण्याचे काम अद्याप सुरू आहे. परंतु आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

    मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय यश यादव यांनी आग लागल्यानंतर आपल्या दोन मुलांसह इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली होती. रुग्णालयात उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला. सकाळी सुमारे १० वाजता एमआरव्ही शाळेजवळील शब्द अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली.

    बघा व्हिडिओ..

    https://www.instagram.com/reel/DKttp_7A6-A/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

    आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशामन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या

    September 4, 2026

    उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!

    September 4, 2026

    विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif