Sunday, January 29, 2023

भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने आज तीन वेगवेगळ्या ठिकाणी वर्षावास प्रारंभाचा कार्यक्रम

- Advertisement -

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

सर्प्रथम शहरातील यशवंत भवन, वाघ नगर, बुद्ध विहारामध्ये बुद्ध पूजा करून वर्षावास प्रारंभाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर बिबा नगर जळगाव येथे नाना वानखेडे यांच्या राहत्या घरी बुद्ध पूजा करून वर्षावास प्रारंभाचा कार्यक्रम पार पडला.

- Advertisement -

तर, तिसरा उद्घाटनाचा कार्यक्रम टाहकळी या गावामध्ये बापू सदावर्ते यांच्या राहत्या घरी बुद्ध पूजा करून वर्षावास प्रारंभाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. वर्षावास प्रारंभाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे कोषाध्यक्ष बी. एस. पवार यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा संस्कार विभाग सचिव रवींद्र वानखेडे होते. प्रमुख उपस्थिती जिल्हा पर्यटन विभाग सचिव सुभाष सपकाळे, शिक्षिका सुनीता वानखेडे, नाना वानखेडे हे उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हा कार्यालयीन सचिव आनंद ढिवरे यांनी केले.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे