Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    • गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»दिवंगत अजित पवार यांची जयंती शासकीय स्तरावर होणार
    महाराष्ट्र

    दिवंगत अजित पवार यांची जयंती शासकीय स्तरावर होणार

    राज्य सरकारचा मोठा निर्णय : शासकीय आदेश जारी
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 16, 2026No Comments165 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले होते. येत्या 22 जुलै रोजी अजित दादांची जयंती आहे. याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अजित दादांची जयंती आता शासकिय स्तरावर साजरी केली जाणार आहे. राज्यस्तरीय सर्व शासकीय कार्यालयामध्ये अजित पवार यांच्या 22 जुलै रोजी होणाऱ्या जयंती दिवशी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात यावा असा शासकीय आदेश राज्य शासनाकडून जारी करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

    राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्याचे नेते स्वर्गीय अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश सन 2026 मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे याबाबत मागणी केली होती. त्यानंतर आज तात्काळ सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले असून अजितदादांच्या लोकसेवेचा आणि महाराष्ट्राच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा राज्य शासनाकडून गौरव करण्यात आला आहे.

    परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती 22 जुलै, 2026 (बुधवार) रोजी राज्यभरात साजरी केली जाणार आहे. या दिवशी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाणार आहे. याशिवाय सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्येही जयंती साजरी होणार आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या भागातील सर्व यंत्रणांमध्ये या कार्यक्रमाचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

    स्वर्गीय अजितदादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रशासनावर ठेवलेली मजबूत पकड, पायाभूत सुविधांचा विकास आणि लोककल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेले परिश्रम यामुळे त्यांना जनमानसात हक्काचे ‘दादा’ म्हणून स्थान मिळाले. शासनाचा हा निर्णय म्हणजे त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाला आणि त्यांच्या अविरत कार्यपद्धतीला दिलेली ही एक मोठी आदरांजली मानली जात आहे. यामुळे आता दरवर्षी २२ जुलै रोजी शासकीय स्तरावर दादांच्या लोकसेवेचा वारसा अधिकृतपणे आठवला जाणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif