जळगाव : डॉ. गुणवंतराव आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयात आरोहण 2026 वार्षिक स्नेहसंमेलनाचा उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मशाल प्रज्वलित तसेच आरोहण 2026 चे प्रतीकात्मक फलक प्रदर्शित करीत प्रारंभाची घोषणा केली. यावेळी कुरुक्षेत्रात कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल यांसारख्या विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
महोत्सवात 8 ते 10 क्रीडा स्पर्धा ,11 मे – प्रॉम नाईट,12 मे – डी जे नाईट वसांस्कुतिक कार्यक्रमाने समारोप करण्यात आला. समारोप प्रसंगी माजी खा. डॉ.उल्हास पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, प्राचार्य डॉ. पंकज शर्मा, प्राचार्य विशाखा गणविर, डॉ पियुष वाघ, प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, डॉ विजय बाविस्कर यांच्यासह प्राध्यापकवर्ग, अध्यापन कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. विविध गायन, वादन व नृत्य कला सादर करीत उपस्थितांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचा यांनी परिश्रम घेतले.


