Saturday, October 1, 2022

अपघात इतका भीषण की चौघांचा जागीच मृत्यू…

- Advertisement -

 

- Advertisement -

चंद्रपूर, लोकशाही न्युज नेटवर्क;

- Advertisement -

- Advertisement -

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली-गडचिरोली मार्गावर भीषण अपघात (Chandrapur Accident) झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, चंद्रपूरहून डीजे संदर्भातील साहित्य खरेदी करून गडचिरोलीला हे सगळे जण परतत होते. बोलेरोतील व्यक्ती, रात्री रस्त्यावर बसलेल्या गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात अचानक स्टेअरिंग रॉड तुटला आणि अचानक बोलेरो बाजूच्या ट्रकवर आदळली. घटनास्थळी सावली व किसान नगर येथील नागरिकांनी पोहचत पोलिसांच्या मदतीने जखमींना रूग्णालयात दाखल केलं. मात्र बोलेरो वाहन ट्रकवर आदळल्याने बोलेरोतील चौघांचा मृत्यु झाला तर एक जखमी आहे. गडचिरोली येथील प्रसिद्ध डीजे वादक पंकज बागडे 26 याचा मृतांमध्ये समावेश आहे. सुरेंद्र हरेंद्र मसराम वय 23 वर्ष रा.चिखली ता.सावली जिल्हा चंद्रपूर हे जखमी झाले आहेत.

सावली पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत. MH 33 A 5157 नंबरच्या महिंद्रा बोलेरो कारने चौघेजण परतत होते. पण वाटेतच काळाने घाला घातला. अपघातातील चौघांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवरही मोठा आघात झाला आहे.

खालील चौघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

  1. पंकज किशोर बागडे वय 26 रा. गडचिरोली,
  2. अनुप रमेश ताडूलवार वय 35 वर्ष रा. विहीरगाव ता.सावली
  3. महेश्वरी अनुप ताडूलवार वय 24 वर्ष रा. विहीरगाव
  4. मनोज अजय तीर्थगिरीवार वय 29 रा. ताडगाव ता. भामरागड

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या