Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»कुठे दहावीची उत्तरपत्रिका थेट शिक्षकाच्या व्हॉट्सअ;ॅपवर
    महाराष्ट्र

    कुठे दहावीची उत्तरपत्रिका थेट शिक्षकाच्या व्हॉट्सअ;ॅपवर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 27, 2026Updated:February 27, 2026No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    बीडच्या पिंपळनेर जिल्हा परिषद सेंटरवर धक्कादायक प्रकार घडला आहे. दहावीचा आज इंग्रजीचा पेपर होता. मात्र पेपरच्या काहीवेळआधीच इंग्रजीच्या पेपरची उत्तर पत्रिका एका शिक्षकाच्या व्हाट्सअप वर व्हायरल झाली असून त्यामध्ये सेट झेरॉक्स काढण्यासाठी दोन प्रश्नांची उत्तरं पाठवण्यात आले होते. त्याचबरोबर लाईट बंद करून काही काळासाठी सीसीटीव्ही फुटेज बंद असल्याचे माहिती समोर आली आहे.

    तसेच लातूरमधून अशीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. लातूर तालुक्यातल्या जोडजवळा येथील समता विद्यालयाच्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर चक्क सीसीटीव्ही कॅमेरा न बसवताच विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत आहे. दरम्यान परीक्षापूर्वीच बोर्डाने परीक्षा केंद्रावर कॉपीसारखे गैरकृत्य होऊ नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तर परीक्षा काळातील चित्रीकरण जतन करण्याचे आदेशही संबंधित परीक्षा केंद्रांना देण्यात आली आहेत. मात्र असे असतानाही लातूरच्या जोडजवळ येथील समता विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एकही सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला नाहीत.

    दरम्यान ही संस्था राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांची आहे. आमदार विक्रम काळे या संस्थेचे सचिव आहेत. त्यामुळे बोर्डाचे नियम डावलून राजरोसपणे सुरू असणाऱ्या या परीक्षा केंद्रावर काय कारवाई केली जाणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

    बीड जिल्ह्याचे कलेक्टर विवेक जॉन्सन यांच्या आदेशाने बीड जिल्ह्यात कॉपी मुक्त परिक्षा राबवण्यासाठी प्रत्येक वर्गात झूम मीटिंगच्या माध्यमातून प्रत्येक वर्गावर लक्ष ठेवले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र बीड जिल्ह्याच्या परळी येथे सध्या इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू असून आज इंग्रजीचा पेपर सुरू आहे, आणि या पेपरला मात्र कॉपी देणाऱ्यांचा सुळसुळाट दिसून येत आहे.

    पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस बंदोबस्त करण्यात आला असला तरी देखील या बंदोबस्ताला कॉपी बहाद्दर जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. तर केंद्रावर प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्येक वर्गात झूम मीटिंगच्या माध्यमातून मुलांच्या आणि शिक्षकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मोबाईलच्या माध्यमातून तीन तास लक्ष असणार असल्याचे सांगण्यात आले असताना देखील कॉपी करण्याचा जोरदार प्रकार सुरू आहे.

    #maharashtra #mla 10th Beed Copy Exam exam center Latur Parli
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

    March 10, 2026

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.