“तो” १४ वर्षीय मुलगा मृतावस्थेत आढळला…

0

 

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तालुक्यातील सामरोद येथील सचिन मारोती पेठे (१४) हा दि.११ नोव्हेंबर रोजी गुरे चारण्यासाठी गेला होता. तो परत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याची शोधाशोध केली होती. परंतु तो कुठेही आढळून न आल्याने आपल्या मुलाला कोणीतरी फुस लावून पळवून नेले असल्याने त्याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दि.१२ नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात इसमा विरोधात भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र आज दि.२० रोजी सकाळी सामरोद येथील स्मशानभूमी लगत असलेल्या मगन रमेश परदेशी यांच्या शेतातील विहिरीत सचिनचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. शरद अशोक कांबळे यांच्या खबरीवरून पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर ९६ / २०२२ नुसार नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास निरीक्षक सुरेश शिंदे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.