ठाणेदार योगेश पारधी यांचा राज्य पत्रकार संघाकडून सन्मान

भद्रावती पोलिस स्टेशनला नव्यानेच रजु झाल्याबद्दल स्वागत

0

 

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

भद्रावती येथील पोलिस स्टेशनला कर्तव्यदक्ष म्हणून ख्याती असलेले नव्यानेच रजु झालेले ठाणेदार योगेश पारधी यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने नुकताच थाटात सत्कार करण्यात आला. पत्रकार संघाने या सत्काराद्वारे त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेतली असून, स्थानिक पोलीस प्रशासनात जनतेचा हितार्थ कामाचे येथील योगयुक्त कामाबद्दल ठानेदारांनी आपले मत व्यक्त केले आहे.

योगेश पारधी यांची नियुक्ती भद्रावती पोलीस ठाण्याच्या नेतृत्वात नवीन उमंग आणि दक्षता घेऊन आलेली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तातडीने स्थानिक कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार असे मत स्पष्ट करून असुन पत्रकार संघाने या कामगिरीचे कौतुक करत त्यांना सत्कारासह अभिमान व्यक्त केला.

या कार्यक्रमात भद्रावतीतील पत्रकार संघाचे पदाधिकारी व समाजमाजी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पारधी यांचा सन्मान करताना संघाचे अध्यक्ष, सरचिटणीस आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पुढील काळातही योगेश पारधी यांचे कार्य जसजसे वाढेल तसतसे त्यांना मिळणाऱ्या सन्मानांत वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी स्थानिक सुरक्षा आणि जनसंपर्क सुधारण्यासाठी पारधी यांचा विचारपूर्वक आणि जनकल्याणकारी दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

या सत्कार वेळी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी स्थानिक पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेला दाद दिली आणि योगेश पारधी यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भद्रावतीतील नागरिकही त्यांच्या कार्यप्रणालीने अतिशय समाधानी होणार असल्याचे त्यांनी आपले मत व्यक्त केले.

या सन्मानाने भद्रावतीच्या पोलीस ठाण्याला व स्थानिक समाजाला एक नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे, ज्यामुळे येथील कायदा सुव्यवस्था अधिक सक्षम आणि प्रभावी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.