धक्कादायक.. ठाण्यात लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट

डब्यात पसरला धूर

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आजकाल मोबाइलशिवाय जीवन जगणे देखील कठीण झाले आहे. मात्र सध्या मोबाईलचा स्फोट होण्याच्या घटना वाढल्या आहेत. ठाण्यात लोकल प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या मोबाईल फोनचा स्फोट झाला आहे. त्यामुळे संपूर्ण डब्यात धूर पसला होता, त्यामुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते.

ठाण्यात घडलेल्या या घटनेबाबत ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-कल्याण लोकल ट्रेनमध्ये सोमवारी रात्री 8.12 वाजता कळवा स्थानकावर ही घटना घडली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या स्फोटामुळे डब्यात धूर पसरला होता, रेल्वे कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक यंत्रांचा वापर केला व मोठी हानी टळली. कळवा स्थानकावर झालेल्या स्पोटाबाबत बोलताना एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, मला कमी तीव्रतेचा स्फोट ऐकू आला. या स्फोटामुळे डब्बा धुराने भरला, ज्यामुळे अनेक प्रवासी उतरण्यासाठी दाराकडे धावले. मात्र रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

ज्या महिलेच्या मोबाईलचा फोन स्फोट झाला तिची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेची चौकशी सुरू आहे. स्फोटामागे बॅटरीची समस्या किंवा इतर काही तांत्रिक समस्या असू शकते. सार्वजनिक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करताना प्रवाशांनी काळजी घ्यावी.’ असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अनेकदा स्मार्टफोन हा जास्त वापरल्याने किंवा गरम झाल्याने त्यातील बॅटरीचा स्फोट होतो. काही वेळा स्मार्टफोन चार्जिंगला लावलेला असताना फोन गरम होऊन सुद्धा स्पोट झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे स्मार्टफोन वापरताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही सुद्धा जास्तवेळ फोन वापरणे टाळा कारण, जास्त वेळ फोन वापरल्याने फोन गरम होतो आणि त्यामुळे सुद्धा स्फोट होण्याचा धोका असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.