Wednesday, September 28, 2022

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई; चोरीचे आणि हरवलेले 100 मोबाईल जप्त

- Advertisement -

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून ठाणे शहरात मोबाईल जबरी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीतसिंग् यांनी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. त्यावर अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त दिनकर मोहिते यांच्या सूचनेनुसार उप निरीक्षक महेश जाधव, पोलीस अंमलदार राजेंद्र काठोळे, अनिल पाटील, शशिकांत भदाणे, नामदेव मुंडे, रोशन जाधव, सागर सुरळकर, हुसेन तडवी यांचे एक पथक स्थापन करण्यात आले.

- Advertisement -

- Advertisement -

या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे या मोबाईलचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि कौशल्याने तपास करून वेगवेगळ्या कंपनीचे 100 मोबाईल आणि दोन गुन्हे उघडकीस आणले. यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असून संबंधित पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आले आहे. त्याबाबत काही मोबाईलचा अजूनही शोध घेतला जात आहे. काही मोबाईल हे सामान्य लोकांना विक्री करून वापरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या बाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त दिनकर मोहिते यांनी लोकांना आव्हान केले आहे की, अशा पद्धतीने मोबाईल चोरी झाला असल्यास जवळील पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधावा. तसेच प्रवासात अथवा रस्त्याने मोबाईल चोरीला जाणार नाही अथवा गहाळ होणार नाही. याबाबत आवश्यक ती काळजी घेण्यात यावी. कोणी कमी किमतीमध्ये मोबाईल विक्री करत असल्यास त्याची शहानिशा करून खरेदी करावे अन्यथा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या