Wednesday, August 10, 2022

संपत्तीच्या वादातून भावजयचा खून; दिराला केले अटक

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

ठाणे 

- Advertisement -

- Advertisement -

डोंबिवली :  दिराला केले अटक .भावजयने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दिराचा बनाव पोलीस तपासात समोर आला आहे. संपत्तीच्या वादातून दिराने खून (Murder) केल्याची घटना टिटवाळा (मुंबई) नजीक असलेल्या उंभरणी गावात घडली आहे. दरम्यान दिराला कल्याण तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी सुरेश त्र्यंबक वाघे असे अटक केलेल्या दिराचे नाव आहे. तर धृपदा जयराम वाघे, (वय ४० वर्षे) असे मृत भावजयचे नाव आहे. कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उभारणी गावातील पाण्याच्या टाकीजवळ ६ फेबुवारी रोजी सकाळच्या सुमारास एका ४० वर्षीय महिलेने तिच्या राहत्या घरात गळफास घेतल्याची माहिती स्थानिकांकडून पोलिसांना देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, सदर प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी याठिकाणचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून, पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली. पंचनाम्यादरम्यान पोलिसांना संशय आल्याने आणि या महिलेने आत्महत्या केली नसून तिची खून (Murder) झाल्याची कुजबुज परिसरातील नागरिकांमध्ये सुरु असल्याने,

याप्रकरणी शवविच्छेदन अहवालात ही आत्महत्या नव्हे, तर तिचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आले आहे. आरोपी सुरेश त्र्यंबक वाघे याला अटक करण्यात आली असून, १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. याविषयी अधिक तपास टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी आणि कर्मचारी करत आहेत.

मृतकच्या बहिणीमुळे खुनाचे कारण आले पुढे…

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिस तपासाचे चक्रे वेगाने फिरवत नातेवाईकांची चौकशी सुरु केली. त्यावेळी मृतक महिलेची बहीण आशा वाघे यांनी मृत धृपदा व तिचा दिर सुरेश त्र्यंबक वाघे यांच्यात जमीन- जागेच्या पैशाचे करणावरून वाद असल्याचे पोलिसांना सांगितले

. त्यानंतर पोलिसांनी दीर सुरेशला ताब्यात घेऊन त्याचेकडे सखोल विचारपूस केली असता, त्याने जागा- जमीन, पैशाच्या वादातून त्याच्या भावाची पत्नी धृपदा हिचा गळा आवळून खून (Murder) केल्याची कबुली पोलिसांना दिली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या